
लोकसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर चर्चा झाली. या चर्चेवेळी बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या अमेरिका दौऱ्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अमेरिकेचं निमंत्रण मिळवण्यासाठी एस जयशंकर यांना अमेरिका दौऱ्यावर पाठवण्यात आलं होतं. तीन वेळा जयशंकर हे अमेरिका दौऱ्यावर गेले असं राहुल गांधींनी म्हटलं. आता यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. राहुल गांधी यांनी भारताची प्रतिमा मलिन करणारं विधान केल्याचा आरोप जयशंकर यांनी केला. २०२४ च्या अमेरिका दौऱ्यात कधीच पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावर चर्चा झाली नाही.