राहुल गांधी भेटणार दिल्लीतील दंगल प्रभावित नागरिकांना

Rahul Gandhi
Rahul Gandhi

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी दंगल प्रभावित ईशान्य दिल्लीतील नागरिकांची भेट घेणार असून, त्यांच्यासोबत अन्य पक्षातील नेतेही असणार आहेत.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी हे दंगल प्रभावित भागाला भेट देणार आहेत. मात्र, त्यांच्या भेटीची तारिख व वेळ अद्याप ठरलेली नाही. दिल्लीत सीएएच्या विरोधात झालेल्या आंदोलनानंतर हिंसाचार झाला होता. तीन दिवसांत झालेल्या हिंसाचारात सुमारे 47 जणांचा मृत्यू झाला होता. हिंसाचाराबाबत अनेक घटना समोर येत असताना आता राजकीय नेते दंगलप्रभावित भागांना भेटी देताना दिसतील.

आज सकाळी संसदेत आले असता राहुल गांधी म्हणाले, की दिल्ली हिंसाचारावर संसदेत चर्चा व्हावी, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. विरोधी पक्षांकडून लोकसभा आणि राज्यसभेत हिंसाचारावर चर्चा करण्याची मागणी होत असली तरी गदारोळ होत आहे. हिंसाचारात गुप्तचर विभागाच्या कर्मचाऱ्यासह, पोलिस कॉन्स्टेबल रतनलाल यांचाही मृत्यू झाला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com