राहुल गांधी कैलास मानसरोवर यात्रेला जाणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या केरळच्या दौऱ्यावर आहेत. हा दौरा आटोपल्यानंतर राहुल गांधी कैलास मानसरोवरच्या यात्रेला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही यात्रा नेपाळ मधून नाहीतर चीन मधून करणार आहेत. कर्नाटक वडणूकीच्या काळातच राहुल यांनी मानसरोवरला जाण्याची घोषणा केली होती. सध्या केरळ मधील पुरगस्त भागाचा आढावा घेऊन पुढील नियोजन बनविणयात येणार आहे.  

जुलै 2017 मध्येच त्यांना ही यात्रा करायची होती. परंतु, एका-पाठोपाठ आलेल्या अनेक राज्यांमधील निवडणूकांमुळे त्यांना ही यात्रा करता आली नाही. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या विधानसभा निवडणूकांच्या एक वर्ष आधीच एप्रिल 2015 मध्ये राहुल यांनी केदारनाथ ची यात्रा केली होती. त्यानंतर कैलास मानसरोवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या जवळील लोकांशी त्यांनी याविषयी चर्चा देखील केली होती. त्याचे नियोजन सुद्धा करण्यात आले होते.

Web Title: Rahul Gandhi will go Kailash Mansarovar Yatra