राहुल गांधींकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 जुलै 2018

राहुल गांधी यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे, की ''उद्धवजी ठाकरे यांना उत्तम आरोग्य आणि आनंद मिळावे यासाठी माझ्या शुभेच्छा !'' 

नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार) शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबतचे ट्विट करत राहुल यांनी शुभेच्छा दिल्या. 

राहुल यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी उद्धव यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातील शिवसेना कार्यकर्त्यांनी आज 'मातोश्री'वर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली आहे. राहुल गांधी यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे, की ''उद्धवजी ठाकरे यांना उत्तम आरोग्य आणि आनंद मिळावे यासाठी माझ्या शुभेच्छा !'' 

भाजप हा शिवसेनेचा मित्रपक्ष असतानाही उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्याचप्रमाणे राहुल गांधीही मोदींवरच निशाणा साधत आहेत. वाढदिवसानिमित्त राहुल उद्धव यांच्या निकट तर जाण्याचा प्रयत्न करीत नाहीना अशीही चर्चा आहे. शिवसेनेनेही कॉंग्रेसचे अनेकवेळा समर्थन केले आहे. मोदींना मिठी मारल्यानंतर शिवसेनेचे राहुल यांच्यावर स्तुतीसुमने उधळली होती. आज राहुल यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi wishes uddhav thackeray for their Birthday