
देशातील बहुतांश शेतकऱ्यांना कृषी कायद्याचे सत्य आणि तपशील ठावूक नसून ते जर समजले तर संपूर्ण देशात आंदोलनाचे रान पेटेल, असा इशारा कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिला. केंद्रीय तपास संस्थांच्या गैरवापरावरुनही राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.
कालपेट्टा (केरळ) - देशातील बहुतांश शेतकऱ्यांना कृषी कायद्याचे सत्य आणि तपशील ठावूक नसून ते जर समजले तर संपूर्ण देशात आंदोलनाचे रान पेटेल, असा इशारा कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिला. केंद्रीय तपास संस्थांच्या गैरवापरावरुनही राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
राहुल गांधी सध्या केरळ दौऱ्यावर असून आज दुसऱ्या दिवशी यूडीएफ कन्वेंशनमध्ये बोलताना ते म्हणाले, देशातील बहुतांश शेतकऱ्यांना कृषी कायद्यांची सत्यता आणि तपशील माहीत नाही. त्यांनी कृषी कायद्याचे अवलोकन केल्यास देशात आंदोलन पेटेल. केंद्रातील भाजप सरकारकडून केंद्रीय तपास संस्थेचा गैरवापर केला जात आहे. विरोधी पक्षाचे सरकार असलेल्या राज्यात सीबीआय व सक्तवसुली संचालनालयाकडून छापेमारी आणि चौकशीसत्र राबवले जात आहे. केरळमध्ये मात्र विधानसभा होत असल्याने केंद्रीय तपास संस्थांची कारवाई होत नसल्याचा दावा त्यांनी केला.
राजदीप सरदेसाईंवर फेक न्यूज पसरवल्याचा ठपका; इंडिया टुडेमधून राजीनामा?
दक्षिणेतील डाव्या आघाडीच्या राज्याबाबत भाजपची भूमिका मवाळ आहे, असा आरोप राहुल यांनी केला. कृषी कायद्यावरून गांधी यांनी केंद्रावर टीकास्त्र सोडले. कृषी कायद्याच्या माध्यमातून केंद्र संपूर्ण कृषी व्यवस्था ही तीन ते चार उद्योगपतींच्या हातात सोपवत आहे. केरळमध्ये यंदाची निवडणूक विचारसरणीवर लढली जाईल, असे ते म्हणाले.
शेतकरी आंदोलन मिटणार? यूपी गेटवर कलम 144'; राकेश टिकैत मागण्यांवर ठाम
मोदी सरकार हे सर्वांसाठी एक धडा असून जगात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था कशी मोडून काढावी हे केंद्र सरकारकडून शिकावे. शेतकऱ्यांच्या विरोधातील कृषी कायदे तात्काळ परत घ्यावेत.
- राहुल गांधी, कॉंग्रेस नेते
Edited By - Prashant Patil