...तर इतिहास माफ करणार नाही : राहुल गांधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 जून 2018

महाराष्ट्रातील जळगावमधील वाकडी येथे अंघोळ करुन विहिर बाटवली म्हणून मातंग समाजातील दोन मुलांची नग्न धिंड काढून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या गंभीर घटनेवरून राहुल गांधींनी आरएसएस आणि भाजपवर निशाणा साधत या घटनेचा निषेध केला.

नवी दिल्ली : जळगावमधील वाकडी येथील घटनेनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) निशाणा साधला. ते म्हणाले, ''महाराष्ट्रातील या दलित मुलांचा गुन्हा केवळ इतका आहे, की त्यांनी 'सवर्ण' समाजाच्या विहिरीत आंघोळ केली. आरएसएस आणि भाजपच्या या विषारी राजकारणाविरोधात आपण जर आवाज उठवला नाही तर इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही''. 

महाराष्ट्रातील जळगावमधील वाकडी येथे अंघोळ करुन विहिर बाटवली म्हणून मातंग समाजातील दोन मुलांची नग्न धिंड काढून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या गंभीर घटनेवरून राहुल गांधींनी आरएसएस आणि भाजपवर निशाणा साधत या घटनेचा निषेध केला. ते म्हणाले, ''महाराष्ट्रातील या दलित मुलांचा गुन्हा केवळ इतका आहे, की त्यांनी 'सवर्ण' समाजाच्या विहिरीत आंघोळ केली. आरएसएस आणि भाजपच्या या विषारी राजकारणाविरोधात आपण जर आवाज उठवला नाही तर इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही''.   

दरम्यान, याप्रकरणी प्रल्हाद उर्फ सोन्या लोहार आणि ईश्वर बळवंत जोशी या दोघांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. 

Web Title: Rahul Gandhis comment on Two boys thrashed paraded naked for swimming in upper caste man well