लढाऊ विमान खरेदीवरून राहुल गांधींची टीका

वृत्तसंस्था
रविवार, 8 एप्रिल 2018

नवी दिल्ली: सरकारने लढाऊ जेट विमान खरेदीसाठी 15 अब्ज डॉलरची फेरनिविदा काढल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे मित्र नवा सहकारी शोधत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी शनिवारी केली.

नवी दिल्ली: सरकारने लढाऊ जेट विमान खरेदीसाठी 15 अब्ज डॉलरची फेरनिविदा काढल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे मित्र नवा सहकारी शोधत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी शनिवारी केली.

लढाऊ विमाने खरेदी करण्यासंदर्भातील प्रक्रिया भारताने शुक्रवारी (ता. 6) सुरू केली. गेल्या काही वर्षांतल्या सर्वांत मोठ्या संरक्षण व्यवहारांपैकी हा व्यवहार असणार आहे. यावर बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. "राफेल' विमानांसाठी फ्रान्सबरोबर केलेला 40 हजार कोटींचा करार रद्द झाल्याने पंतप्रधान मोदी आता नव्याने फेरनिविदा काढीत आहेत. यासाठी नव्या सहकाऱ्याचा शोध घेत आहे, अशी टीका त्यांनी ट्विटरवरून केली आहे.

Web Title: Rahul Gandhi's criticism from fighter aircraft purchase