पंतप्रधान मोदींच्या ट्विटमुळं खळबळ; सोशल मीडियाला रामराम ठोकण्याचा विचार

वृत्तसंस्था
सोमवार, 2 मार्च 2020

नोटबंदी, सर्जिकल स्ट्राईक यांसारख्या धडाकेबाज निर्णयांमुळे मोदींची प्रसिद्धी सातासमुद्रापार पोहोचली. मोदी सोशल मीडियातही प्रचंड अॅक्टिव्ह राहत असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत राहिली.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (ता.२) मोठी घोषणा केली आहे. येत्या रविवारी सोशल मीडियाचा वापर बंद करणार आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या साऱ्या सोशल मीडियावरून प्लॅटफार्मवरून एक्झिट घेण्याचा त्यांचा विचार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोशल मीडियात सर्वाधिक फाॅलोअर्स आहेत. तसेच सर्वाधिक फॉलोअर्स असणारे जगातील टॉप फाईव्ह नेत्यांमध्येही त्यांची गणना होते. त्यांच्या या घोषणेमुळे सोशल मीडियात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेवर चौदा मिनिटांत तीन हजारांहून अधिक प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. मात्र, मोदींच्या जगभरातील चाहत्यांनी मोदींनी सोशल मीडियाचा त्याग करू नये, अशी विनवणी केली आहे. झटपट निर्णय घेणे हा मोदी यांचा गुणधर्म आहे.

- Nirbhaya Case:दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा, कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

मोदींनी केलेल्या ट्विटमध्ये मोदींनी म्हटले आहे की, ''येत्या रविवारपासून मी सोशल मीडिया सोडण्याचा विचार करत आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्युब या सर्व सोशल मीडियातून बाहेर पडून ही सर्व अकाऊंट्स बंद करण्याची इच्छा आहे. तसेच येत्या रविवारी मी याबाबतची भूमिका स्पष्ट करणार आहे.''

दरम्यान, २०१४ मध्ये भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींची फॅन फॉलोअर्सची संख्या कोटींच्या घरात पोहोचली. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून त्यांनी अनेक निवडणुकाही जिंकल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडिया सोडण्याबाबत मोदी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. 

- सावधान! कोरोना दिल्लीत धडकलाय; भारतात पुन्हा आढळले दोन रुग्ण

नोटबंदी, सर्जिकल स्ट्राईक यांसारख्या धडाकेबाज निर्णयांमुळे मोदींची प्रसिद्धी सातासमुद्रापार पोहोचली. मोदी सोशल मीडियातही प्रचंड अॅक्टिव्ह राहत असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत राहिली. 

दरम्यान, नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केले जाणारे राजकीय नेते आहेत. इन्स्टाग्रामवर 3 कोटी 52 लाख, ट्विटरवर 5 कोटी 33 लाख आणि फेसबुकवर 4 कोटी 45 लाख लोक मोदींना फॉलो करतात, तर मोदींच्या यूट्यूब चॅनेलला 45 लाख सबस्क्राईबर आहेत.

- "...नाहीतर मला स्वतःला रस्त्यावर उतरायला लागेल" - छत्रपती संभाजीराजे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi may exit social media on Sunday