Congress Crises Live : राहुल गांधींवर नाराजी, गुलाम नबी आझादही राजीनाम्याच्या तयारीत

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 24 August 2020

काँग्रेसमध्ये Congress नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसमध्ये दोन दिवसांपासून खल सुरू आहे.

नवी दिल्ली- काँग्रेसमध्ये Congress नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावरुन कार्यकारिणीची बैठक CWC झाली. बैठकीत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. यावरून ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली. त्यांनी काही मिनिटांतच ट्विट मागे घेतले असले तरी. राहुल गांधी यांच्या भूमिकेवर गुलाम नबी आझाद यांनीही नाराजी व्यक्त करत राजीनाम्याची तयारी दर्शवलीय. 

कोण म्हणतं काँग्रेस फक्त गांधी घराण्याचा पक्ष? 19 पैकी 14 अध्यक्ष इतर

राहुल गांधी यांनी पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान पत्र लिहिण्याच्या वेळेमागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे. भाजपसोबत लागेबांधे असल्याने पक्ष संकटाच्या स्थितीत असताना पत्र लिहिण्यात आले, अशी शंका राहुल यांनी घेतली. कपिल सिब्बल यांच्या ट्विटनंतर राहुल गांधी आणि सिब्बल यांच्यात बोलणं झालं असून, आपण तसं वक्तव्य केलं नसल्याचं राहुल यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले आझाद?
राहुल गांधी यांनी नेतृत्वबदलासाठीच्या पत्रावर नाराजी व्यक्त केलेली नाही तर, पत्र पाठवण्याची वेळ चुकल्याचं मत व्यक्त केल्याची माहिती आहे. मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये पक्ष संकटात आहे. तसेच, अध्यक्ष आजारी आहेत, अशा वेळीच पत्र का लिहिले? अशी शंका राहुल यांनी उपस्थित केल्याचं बोललं जातंय. गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधी यांच्या कथित वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. भाजपशी लागेबांधे असल्याचा आरोप सिद्ध झाला तर, पक्षाचा राजीनामा देण्याची तयारी आझाद यांनी दर्शवलीय.  

आणखी वाचा - कपिल सिब्बल यांच्या ट्विटने काँग्रेसमध्ये खळबळ

काँग्रेसच्या २० पेक्षा अधिक वरिष्ठ नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहित नेतृत्व बदलाची मागणी केली आहे. पक्षाला पूर्णवेळ आणि सक्रीय असा अध्यक्ष असावा. तसेच पक्षात वरपासून खालीपर्यंत बदल करण्याची मागणी पत्रात करण्यात आली आहे. पत्रात गांधी कुटुंबीयांवर थेट टिका करण्यात आली नाही. मात्र, लवकरात लवकर अध्यक्ष निवडण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक पदासाठी निष्पक्ष निवडणुका घेण्याची मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे. कपील सिब्बल, शशी थरुर, गुलाम नबी आझाद, पृथ्वीराज चव्हाण, विवेद टांका, आनंद शर्मा यांसारख्या वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहित तात्काळ नेतृत्व बदलाची मागणी केली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये पेपर बॉम्ब फुटला आहे. 

सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. शिवाय पक्षाला अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार निवडण्यास सांगितलं आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सोनिया गांधीच्या समर्थनात पुढे आले आहे. त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्र लिहिणे दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. पक्षाच्या हाय कमांडला दुर्बेल करणे, पक्षाला दुर्बेल करण्यासारखे असल्याचं ते म्हणाले आहेत.

कपिल सिब्बल यांच्या एका ट्विटने काँग्रेसमध्ये खळबळ
 

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi's serious allegations against senior Congress leaders Letter Bomb