राहुल गांधी आज बिदरला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

बंगळूर - अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहुल गांधी सोमवारी (ता. १३) कर्नाटकच्या दौऱ्यावर येणार आहेत. बिदर येथील नेहरू मैदानात आयोजित केलेल्या जनध्वनी कार्यक्रमाचे त्यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार असून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ते प्रारंभ करतील. 

विधानसभा निवडणुकीनंतर गांधींचा हा पहिलाच कर्नाटक दौरा आहे. बिदरच्या जनतेने काँग्रेसला साथ दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कार्यक्रम होत असल्याने त्याला व्यापक स्वरूप दिले आहे. 

Web Title: Rahul Gandi on Karnataka Tour