सुटीवरुन परतले राहुल गांधी...

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जानेवारी 2017

गांधी यांनी आता पक्षामधील ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. राहुल यांच्या माता सोनिया गांधी यादेखील मुलाची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्याचे सूत्रांनी म्हटले आहे

नवी दिल्ली - कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे काही दिवसांच्या सुटीनंतर आज (मंगळवार) परत मायदेशी परतले.

गांधी हे नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी लंडन येथे गेले होते. भारतात परतल्यानंतर आता गांधी यांनी पक्षामधील ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. राहुल यांच्या माता सोनिया गांधी यादेखील मुलाची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर राहुल यांनी सरकारला अनेकदा लक्ष्य केले होते. राहुलसह अन्य कॉंग्रेस नेत्यांनीही सरकारच्या या निर्णयामुळे देशातील गरीबांना फटका बसल्याचे टीकास्त्र सोडले होते. यानंतर राहुल हे सुट्टीवर गेले होते. जाण्याआधी राहुल यांनी सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत लंडनला प्रयाण केले होते.

Web Title: Rahul returns to India after holiday