गुजरातमध्ये मद्य पार्टीवर छापा; 261 जणांना अटक

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 24 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

अहमदाबाद - बडोदा येथील अखंड फार्महाउसवर रंगलेल्या एका मद्य पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून तब्बल 216 जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये उद्योगपती व व्यावसायिकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

गुजरात सरकारने आठवडाभरापूर्वी मद्यबंदी कायद्यात सुधारणा करत कडक तरतुदींचा समावेश केला आहे. या पार्श्‍वभूमीवर कारवाईला महत्त्व प्राप्त झाले असून, गुरुवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये 134 महिलांचा समावेश असून, हे सर्व उच्चभ्रू वर्गातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फार्महाउसचे मालक व उद्योगपती जितेंद्र शहा यांच्या नातीच्या लग्नाच्या पार्श्‍वभूमीवर ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत उद्योगपती चिरायू अमिन त्यांचे सुपुत्र उदित अमीन, मुंबईतील प्रसिद्ध व्यक्ती अमित झवेरी, महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या सदस्या गीता गोराडिया व त्यांचे पती अमित गोराडिया हे सहभागी झाले होते.

पोलिसांनी येथून 82 आलिशान गाड्यांसह मद्याच्या 103 व बियरच्या 116 बाटल्या जप्त केल्या असून, उद्योगपती जितेंद्र शहा व त्यांचे सुपुत्र अलय शहा यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नवीन कायद्यानुसार त्यांना 10 वर्षांपर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती पोलिस अधीक्षक सौरभ तोलुबिया यांनी दिली.
दरम्यान, अलय शहा यांनी पार्टीची माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या विविध प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना धक्काबुक्की केल्याचा प्रकारही घडला आहे.

सर्वांना जामीन; कॉंग्रेसची टीका
पोलिसांनी कारवाई करून अटक केलेल्या सर्वांची आज जामिनावर मुक्तता करण्यात आली. आता हे प्रकरण न्यायालयात गेले असून, त्यावर सुनावणी होणार आहे. दरम्यान, त्यांना जामीन कसा मंजूर झाला, असा प्रश्‍न कॉंग्रेसने उपस्थित केला असून, हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे.

Web Title: Raid on party