NDRF Training : बचाव कार्याचे टायगर ! दरड कोसळल्यावर मदतीसाठी एनडीआरएफला असं दिलं जातं खास प्रशिक्षण

दरड कोसळल्यावर मदतीसाठी एनडीआरएफला खास प्रशिक्षण दिले जाते
NDRF Training
NDRF Training esakal

NDRF Training : यंदाच्या पावसाळ्यात ४१ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका असून कुर्ला पश्चिम, घाटकोपर, भांडुप, चेंबूर येथे डोंगराळ भाग अधिक असल्याने या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित केल्याचे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) असिस्टंट कंमाडर सारंग कुर्वे यांनी सांगितले. दरड कोसळल्यानंतर मलब्याखाली दबलेल्या लोकांचा शोध घेणे हे एक मोठे आव्हान यंत्रणेपुढे असते.

ही परिस्थिती कशी हाताळावी यासाठी एनडीआरएफला खास प्रशिक्षण दिले जाते. एनडीआरएफच्या पथकाबरोबर ‘टायगर’ हा कुत्रा आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत असतो.

पावसाळ्यात दरड कोसळणे, इमारत कोसळणे, पूरस्थिती निर्माण झाल्यावर अडकलेल्यांना रेस्क्यू करणे अशा विविध बचावकार्यात ‘टायगर’ची भूमिका महत्त्वाची असते. एखादी व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकली हे ‘टायगर’ वास घेत खुणावतो आणि त्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढणे शक्य होते.

दरड कोसळण्याच्या प्रकणांमध्ये बचावकार्यासाठी एनडीआरएफ टीमला खास प्रशिक्षण दिले जाते.

छोटा काश्मीर येथे बोटिंगचे प्रशिक्षण

पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाल्यावर बचावकार्य करण्यात कुठल्या अडचणी येऊ शकतात, कशाप्रकारे पाण्यात अडकलेल्यांना बोटीच्या साहाय्याने रेस्क्यू करणे याचे प्रशिक्षण एनडीआरएफ टीमला दिले जाते. सराव करण्यासाठी मुंबई महापालिकेने छोटा काश्मीर येथील तलावात प्रशिक्षणाची व्यवस्था केल्याने त्या ठिकाणी टीमचे बोटिंगचे प्रशिक्षण सुरू असते.

NDRF Training
Irsalwadi Landslide: रेस्क्यू ऑपरेशनला सुरूवात, NDRF दाखल

हाय रिस्कची रेकी

ज्या भागात पाणी तुंबण्याचा, इमारत अथवा दरड कोसळण्याचा धोका आहे, जसे की दादर, परळ, अंधेरी, सायन,कुर्ला, चेंबूर, घायकोपर, कांजूर, भांडुप,दहिसर या भागांतील धोकादायक ठिकाणांची रेकी केली जाते.

व्हिक्टिम लोकेटिंग कॅमेराचा उपयोग

एखाद्या ठिकाणी घटना घडली आणि कोणी ढिगाऱ्याखाली दाबले गेले असेल किंवा अडकले असेल तर अशांचा शोध घेण्यासाठी व्हिक्टिम लोकेटिंग कॅमेरा याचा वापर केला जातो. हा कॅमेरा लहानशा खिद्रातून आत टाकण्यात येतो आणि आत कोणी अडकले आहे का, याचा शोध घेतला जातो.

NDRF Training
Irshalgad Landslide:दुर्घटनास्थळी शिवभोजन थाळी वाटपाचे आदेश, लोकांना किराणा पुरवठा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

ग्रीन कॉरिडोअरची सुविधा

आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी वेळेत पोहोचता यावे, यासाठी एनडीआरएफच्या टीमसाठी स्वतंत्र मार्ग अर्थात ग्रीन कॉरिडोअर उपलब्ध केला जातो. त्यामुळे टीमला घटनास्थळी पोहोचण्यात अडचण येत नाही, असे एनडीआरएफ असिस्टंट कंमाडर, सारंग कुर्वे म्हणाले.

NDRF Training
NDRF : ‘एनडीआरएफ’ देणार वणवा नियंत्रित करण्याचे प्रशिक्षण

एनडीआरएफ टीमसोबत 'टायगर' या कुत्र्याची भूमिकाही महत्वाची

ढिगाऱ्याखाली कोण अडकले, याचा शोध घेण्यात अडचणी येत असल्या तरी एनडीआरएफच्या टीमचा सहकारी टायगर मदतीची महत्वाची जबाबदारी पार पाडत असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com