

Food Outlets On Railways Station
ESakal
भारतीय रेल्वेने त्यांच्या केटरिंग धोरणात एक मोठा बदल केला आहे. ज्याअंतर्गत प्रवाशांना लवकरच स्थानकांवर केएफसी, मॅकडोनाल्ड्स, पिझ्झा हट, हल्दीराम आणि बिकानेरवाला सारखे प्रसिद्ध ब्रँड मिळू शकतील. स्थानकांच्या पुनर्विकासासोबतच, रेल्वे आता अन्न आणि पेय सुविधांमध्ये सुधारणा करण्याची तयारी करत आहे. ज्यामुळे देशभरातील १२०० हून अधिक स्थानकांवर चांगले अन्न पर्याय उपलब्ध होतील.