रेल्वेचे सुरक्षा दलच खरेदी करणार साहित्य

पीटीआय
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : सरकारने आता रेल्वे सुरक्षा दलाच्या आधुनिकीकरणासाठी पहिले पाऊल उचलले असून, या दलाच्या सुरक्षा साहित्यामध्ये छुपे कॅमेरे, फायरिंग सिम्युलेटर्स, बॉडी कॅमेरे आणि अन्य आधुनिक गॅझेटचा समावेश असेल. या आधुनिक संसाधनांची खरेदी करण्याचे सर्वाधिकार रेल्वे पोलिसांना दिले असल्याचे रेल्वे मंडळानेच प्रसिद्ध केलेल्या आदेशात म्हटले आहे.

आतापर्यंत रेल्वे पोलिसांना कसल्याही प्रकारची संरक्षण सामग्री खरेदी करण्यापूर्वी रेल्वे मंडळाची मान्यता घ्यावी लागत असे. आता रेल्वे सुरक्षा दलातील विभागीय आणि क्षेत्रीय पातळीवरील अधिकाऱ्यांना संरक्षणविषयक सामग्री खरेदी करण्याचे प्रशासकीय आणि आर्थिक अधिकार बहाल करण्यात आले आहेत. 

ड्रोन कॅमेरे, सामानांसाठी स्कॅनर्स, ड्रॅगन सर्च लाइट्‌स, उद्‌घोषणा प्रणाली, छुपे कॅमेरे, वेब आणि मोबाईलसाठी आवश्‍यक गॅझेट्‌स आणि व्हॉइस रेकॉर्डर आदी गोष्टी रेल्वे पोलिस दल खरेदी करू शकेल. ही आधुनिक सामग्री हाती आल्याने रेल्वे पोलिस दलाच्या कामगिरीमध्ये मोठी सुधारणा होईल, असा आशावाद अधिकाऱ्यांकडून व्यक्त होतो आहे. 

खरेदी सुलभ 

साहित्य सामग्रीच्या खरेदी प्रक्रियेमध्ये थेट अधिकाऱ्यांना सामावून घेतल्याने योग्य साधनांची खरेदी होऊ शकेल तसेच यासाठीची खरेदी प्रक्रियादेखील अधिक सुलभ होईल, असा काही अधिकाऱ्यांचा दावा आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या कामाची व्याप्ती मोठी असून, रेल्वेतील प्रवाशाबरोबरच मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारीही त्यांच्याकडे असते. 

Web Title: Railway Safety Team will buy Equipment