रेल्वे प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या; जास्त सामान न्याल तर महागात पडेल !

"अगर आपका सामान होगा ज्यादा, तो सफर का आनंद होगा आधा"
Railway Travelers more luggage will cost more Information official Twitter handle of Railways delhi
Railway Travelers more luggage will cost more Information official Twitter handle of Railways delhisakal

नवी दिल्ली - बॅगाच्या बॅगा, पोती, गोण्या , रेल्वे प्रवासात प्रचंड सामान नेणाऱया वा तसे करण्याची सवय असलेल्या प्रवाशांनी सावध रहावे असा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. रेल्वेने इशारा दिला आहे की निर्धारित मर्यादेच्या पलीकडे सामान नेल्यास विमानाप्रमाणेच त्याचे भाडेही संबंधित प्रवाशांकडूनच वसूल केले जाईल. रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून आज याबाबतची माहिती देण्यात आली. "अगर आपका सामान होगा ज्यादा, तो सफर का आनंद होगा आधा, अशी टॅगलाईन या ट्विटच्या सुरवातीलाच देण्यात आली आहे. त्यानुसार सामान नियमापेक्षा जास्त न्याल तर तुम्हाला नियमांच्या` दंडकारण्यातून` जावे लागून तुमच्या प्रवासाच्या आनंदावर विरजण पडू शकते.

आवश्यकतेशिवाय जास्त सामान एक तर नेऊच नये किंवा तसे न्यायचेच असेल तर पार्सल कार्यालयात जाऊन त्याचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. या अतिरिक्त शुल्काची रक्कम विमानांप्रमाणे अतिरिक्त मालासाठीच्या दरांप्रमाणेच राहील असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे. यानुसार फर्स्ट क्लासने जाणारे प्रवासी आपल्यासोबत जास्तीत जास्त 70 किलोग्रॅम, एसी-2 मधील ्परवासी 50 किलो व एसी-3, स्लीपर, एसी चेअर कार व जनरल डब्यांमधून प्रवास करणारांना आपल्यासोबत जास्तीत जास्त 40 किलो वजनाइतके सामान घेऊन जाऊ शकतात. अतिरिक्त सामानासाठी 30 रूपये जास्त शुल्क आकारले जाईल.

यापेक्षा जास्त वजनाचे सामान तुमच्यासोबत असल्याचा संशय आला तर त्याची चौकशी केली जाईल. जरूरीपेक्षा जास्त किंवा नियमापेक्षा अतिरिक्त सामान रेल्वेतून न्यायचे असेल तर जास्त शुल्क भरूनच ते नेता येईल. तसे न केल्यास त्यासाठी दंड आकारला जाईल. अतिरिक्त सामान न्यायचे असेल तर गाडी सुटण्याच्या वेळएच्या किमान 30 मिनीटे अगोदर जाऊन पार्सल कार्यालयातून त्याची नोंद करून रीतसर शुल्क भरावे लागेल. जर असे अतिरिक्त सामान व्यवस्थित पॅकिंग केलेले नसेल तर ते पार्सल कार्यालय स्वीकारणआर नाही अशीही सूचना रेल्वेने दिली आहे. सामानाच्या अॅडव्हान्स बुकींगसाठीही रेल्वेचे यापूर्वीचे नियम लागू रहातील असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com