Railway News: भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! रेल्वे ट्रॅकखाली १२ तासांत सबवे उभारणार; ग्रामीण भागासाठी ‘गेमचेंजर’ योजना

Railway tracks underpass construction: ग्रामीण भागात रेल्वे रुळ ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने 'रेडीमेड कल्व्हर्ट' योजना सुरू केली आहे. हा भुयारी मार्ग अवघ्या १२ तासांत तयार होईल.
Railway tracks underpass construction

Railway tracks underpass construction

ESakal

Updated on

देशाची जीवनरेखा असलेल्या भारतीय रेल्वेवरील अपघात टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालय एक नवीन उपक्रम हाती घेत आहे. देशभरातील ग्रामीण भागातील लोकांना रेल्वे रुळ सहजपणे ओलांडता यावेत यासाठी रुळांखाली रेडी-मेड कल्व्हर्ट्स बांधण्यात येतील. रेल्वे रुळांवरून जाणारे हे सोयीस्कर भुयारी मार्ग केवळ १२ तासांत बांधता येतात. ही माहिती देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, रेल्वे रुळ ओलांडताना होणारे अपघात रोखणे हे रेल्वेचे आता मिशन मोडवर उद्दिष्ट आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर भुयारी मार्ग बांधण्याची योजना आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com