रेल्वेत लवकरच 1.4 लाख लोकांना रोजगार; केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची माहिती

railways recruitment 2022 railway minister ashwini vaishnaw in rajya sabha on jobs in indian railway
railways recruitment 2022 railway minister ashwini vaishnaw in rajya sabha on jobs in indian railway

नवी दिल्ली : भारतातील दळणवळण व्यवस्थेचा प्राण समजल्या जाणाऱ्या रेल्वेने आतापर्यंत मोठ्याप्रमाणावर रोजगार उपलब्ध करून दिले असून भविष्यामध्ये या क्षेत्रात नव्याने काही रोजगार निर्माण होणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेमध्ये याबाबतची माहिती दिली. भारतीय रेल्वे आणखी 1.4 लाख लोकांना रोजगार देईल आणि त्यांची भरती करण्याची प्रक्रिया या आधीच सुरू झा्ल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ही भरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 10 लाख नोकऱ्या देण्याच्या घोषणेचा भाग असल्याचे वैष्णव म्हणाले.

अश्विनी वैष्णव म्हणाले की, रेल्वेत 1.4 लाख पदांसाठी भरती प्रक्रिया सुरूआहे आणि लवकरच ती पूर्ण होईल, राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पूरक प्रश्नांना उत्तर देताना, रेल्वेने या वर्षी आतापर्यंत 18,000 नोकऱ्या दिल्या असल्याचे देखील वैष्णव यांनी सांगितले.

काही लोक हे दहा ते वीस हजार रुपये देण्याच्या राणाभीमदेवी थाटामध्ये घोषणा करतात, पण आम्ही प्रत्यक्षात नियुक्त्या केल्या आहेत, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. देशातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात भारतीय रेल्वेचे मोठे योगदान आहे, हे अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, 2014 ते 2022 दरम्यान 3,50,204 लोकांची भरती करण्यात आली आहे.

railways recruitment 2022 railway minister ashwini vaishnaw in rajya sabha on jobs in indian railway
WazirX क्रिप्टो एक्सचेंजवर ईडीची कारवाई; 65 कोटींची संपत्ती गोठवली

ते म्हणाले, 2014 ते 2022 दरम्यान, भारतीय रेल्वेने 3,50,204 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. केवळ या वर्षात, आतापर्यंत तब्बल 18,000 रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

पुढे बोलताना वैष्णव यांनी माहिती दिली की, रेल्वे ही एक मोठी संस्था असल्याने, निवृत्ती, राजीनामा, मृत्यू इत्यादींमुळे रिक्त पदे भरणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. प्रक्रियेदरम्यान, रिक्त पदे उद्भवू शकतात आणि ती नंतर भरली जातात. गेल्या दोन वर्षांमध्ये, 10,189 उमेदवारांची भरती करण्यात आली आहे.

railways recruitment 2022 railway minister ashwini vaishnaw in rajya sabha on jobs in indian railway
OnePlus चा सर्वात स्वस्त फोन लॉन्च, किंमत १६ हजारांहून कमी

सध्या, सुमारे 1,59,062 पदांसाठी थेट भरती श्रेणीतील रिक्त पदांची भरती विविध टप्प्यांवर आहे, असे देखील त्यांनी सांगितले. यासोबतच अलीकडे, सुमारे 1.15 कोटी अर्जदारांनी रेल्वे ग्रेड IV नोकऱ्यांसाठी अर्ज केले, ज्यात ट्रॅक मेंटेनर, हॉस्पिटलमधील सहाय्यक, लोको शेड, डेपो आणि पॉइंट्समन यांच्यासह इतर लेव्हल1 ग्रेड कॅटेगरीचा समावेश आहे,

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com