पर्यटन विकासाला रेल्वेचा बूस्टर; आता देशभर धावणार १९० ‘भारत गौरव’ विशेष गाड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटन विकासाला रेल्वेचा बूस्टर; आता देशभर धावणार १९० ‘भारत गौरव’ विशेष गाड्या
पर्यटन विकासाला रेल्वेचा बूस्टर; आता देशभर धावणार १९० ‘भारत गौरव’ विशेष गाड्या

पर्यटन विकासाला रेल्वेचा बूस्टर; आता देशभर धावणार १९० ‘भारत गौरव’ विशेष गाड्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : प्रवासी आणि मालवाहतुकीला बुस्टर डोस दिल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने खास पर्यटन क्षेत्र डोळ्यासमोर ठेवून १९० ‘भारत गौरव’ विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज याची घोषणा केली. खासगी आणि ‘आयआरसीटीसी’ अशा दोन्हींमार्फत या गाड्या चालविण्यात येतील असेही त्यांनी नमूद केले. येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, ‘ या काही वेळापत्रकानुसार धावणाऱ्या नियमित गाड्या नाहीत. या विशिष्ट संकल्पनेला वाहिलेल्या गाड्यांसाठी ३ हजार ०३३ डबे अथवा १९० गाड्या निश्चित करण्यात आल्या आहेत. देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्यांच्या माध्यमातून देशाची संस्कृती आणि वारसा याचे दर्शन प्रवाशांना होईल. या संदर्भातील अर्ज मागविण्यास देखील आजपासूनच सुरूवात होईल.’

हेही वाचा: Farm Bills: 'तो अहवाल सार्वजनिक करा'; अनिल घनवट यांची सुप्रीम कोर्टाकडे मागणी

भाडे माफकच राहणार

‘‘ मोदी यांनीच सर्वप्रथम ही संकल्पना मांडली. देशाचा सांस्कृतिक वारसा लोकांना समजावा म्हणून अशा गाड्या सुरू कराव्यात असे त्यांनी म्हटले होते. या गाड्यांसाठीची भाडी हे संबंधित ऑपरेटर निश्चित करतील पण त्या अवास्तव असू नये म्हणून रेल्वे काळजी घेईल,’’ असेही वैष्णव यांनी स्पष्ट केले. या गाड्या त्या क्षेत्राशी संबंधित सर्व धार्मिक स्थळांना जोडण्याचे काम करतील. उदा ः ‘गुरूकृपा’ नावाची गाडी गुरूनानक यांच्याशी संबंधित सर्व धार्मिकस्थळांपर्यंत जाईल. रामायण संकल्पनेवर आधारित गाडीतून भगवान श्रीरामाशी संबंधित सर्व धार्मिकस्थळे जोडली जातील, असे रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा: ओवैसींनी सांगितलं शिवसेनेचं भविष्य; म्हणाले, '2024 साली शिवसेना नक्कीच...'

राज्यांनाही रस

आम्ही या योजनेच्या अनुषंगाने अनेक भागधारकांशी चर्चा केली असून विविध राज्यांनीही अशाप्रकारच्या गाड्या चालविण्यात रुची दर्शविली आहे. सध्या या गाड्यांसाठी कारखान्यांमध्ये तयार करण्यात आलेल्या डब्यांना अधिक मागणी असली तरीसुद्धा भविष्यामध्ये त्यांना वंदे भारत आणि व्हिस्टाडोम आणि एलएचबी असे डबे जोडण्यात येतील असेही वैष्णव यांनी सांगितले.

loading image
go to top