पावसासाठी आमदारांची चिखलाने आंघोळ; इंद्रदेवाला खूश करण्याचा प्रयत्न

Uttar Pradesh Rain News
Uttar Pradesh Rain NewsUttar Pradesh Rain News
Updated on

महाराजगंज : उत्तर प्रदेशच्या महाराजगंजमध्ये पाऊस (Rain) पडत नसल्याने त्रस्त झालेल्या महिलांनी इंद्रदेवाला (Indra) प्रसन्न करण्यासाठी भाजप आमदार जय मंगल कन्नोजिया आणि नगरपालिका अध्यक्ष कृष्ण गोपाल जैस्वाल यांना चिखलाने आंघोळ घातली. महिलांनी दोन्ही लोकप्रतिनिधींकडे जाऊन चिखलाने आंघोळ करू देण्याची विनंती केली. ही विनंती लोकप्रतिनिधींनी मान्य केल्यानंतर दोघांनाही चिखलाने आंघोळ घातली.

यावर्षी मान्सून पूर्व उत्तर प्रदेशवर नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. पावसासाठी एकच गोंधळ उडाला आहे. लखनौ, गोरखपूर, वाराणसीसह पूर्व उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये उष्णता आणि आर्द्रतेमुळे लोक हैराण झाले आहेत. सुमारे ३० टक्के तांदळाची रोपे वाळली आहेत. शेतकरी आशेने आभाळाकडे बघत आहेत.

Uttar Pradesh Rain News
जन्मतारीख सेवेतील ज्येष्ठतेचा आधार होऊ शकत नाही - ओडिसा हायकोर्ट

कष्टकरी, नोकरदार, दुकानदार, शहरांमध्ये राहणारे विद्यार्थ्यांसह सर्व वयोगटातील लोक पावसाची वाट पाहत आहेत. अशा स्थितीत उष्णतेने त्रस्त झालेल्या लोकांनी युक्त्या सुरू केल्या आहेत. महाराजगंजमध्ये लोकांनी आमदार आणि नगराध्यक्षांना चिखलाने अंघोळ घालण्याचा प्रयत्न केला. परिसरातील प्रतिष्ठित लोकांना चिखलाने स्नान केल्याने इंद्रदेव प्रसन्न होतो. खूप पाऊस पडतो, असे चिखल ओतण्यासाठी आलेल्या महिलांनी सांगितले.

जुनी समज आणि परंपरा

उष्णतेमुळे लोक हैराण झाले आहेत. चिखलाने स्नान केल्याने इंद्रदेव खूश होतात अशी जुनी समज आणि परंपरा आहे. याचे पालन केले आहे, असे आमदार जय मंगल कन्नोजिया यांनी सांगितले. नगरपालिकेचे अध्यक्ष कृष्ण गोपाल कन्नोजिया म्हणाले की, पिके वाचवण्यासाठी पाऊस खूप महत्त्वाचा आहे. पावसाच्या संदर्भात चिखलाने आंघोळ करण्याची मान्यता आणि परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे.

आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार

उष्मा आणि आर्द्रतेचा सामना करणाऱ्या उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लोकांना आणखी काही काळ मान्सूनच्या पावसाची वाट पाहावी लागणार आहे. लखनौ येथील विभागीय हवामान केंद्राचे संचालक जेपी गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, उत्तर प्रदेशात मान्सूनच्या (Monsoon) पावसासाठी आणखी एक आठवडा लागू शकतो. सोनभद्रमध्ये मान्सूनच्या प्रवेशानंतर वेग कमी झाला. ज्यामुळे मान्सून पूर्व उत्तर प्रदेशच्या दिशेने जाऊ शकला नाही. त्यामुळे पूर्व उत्तर प्रदेशात पाऊस पडत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com