
छत्तीसगढच्या रायपूरमध्ये रविवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला असून यात १३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रायपूर-बलोदाबाजार रोडवर सारागांव परिसरात ही दुर्घटना घडलीय. ट्रक आणि ट्रेलरची धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.