Nawya Malik Drugs Case
esakal
रायपूर : ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक झालेल्या इंटीरियर डिझायनर नव्या मलिक (Nawya Malik Drugs Case) हिला न्यायालयाने ४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मुंबईतून अटक करण्यात आलेल्या नव्यावर दिल्ली व मुंबईहून रायपूरला एमडीएमएसारखे अमली पदार्थ पुरवण्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणात अयान परवेझलाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याने संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.