esakal | Raipur : मारले गेलेले ‘ते’ नक्षलवादी नव्हते
sakal

बोलून बातमी शोधा

raipur

Raipur : मारले गेलेले ‘ते’ नक्षलवादी नव्हते

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रायपूर : सुमारे आठ वर्षापूर्वी विजापूर जिल्ह्यातील एडेसमेटा येथे चकमकीत मारलेले गेलेले आठ जण नक्षलवादी नव्हते, असा निष्कर्ष एका न्यायिक समितीने आपल्या अहवालातून काढला आहे. हा अहवाल काल छत्तीसगड मंत्रिमंडळाला सादर करण्यात आला आहे. न्यायिक समितीचे अध्यक्ष आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही. के. अग्रवाल यांनी सुरक्षा दलाने भीतीपोटी गोळीबार केला असावा, असा अंदाज अहवालात वर्तविला आहे.

एडेसमेटा येथे १७ ते १८ मे २०१३ च्या रात्री चकमक झाली होती. तत्पूर्वी सुकमा जिल्ह्यात झीरम खोऱ्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात राज्यातील कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यासह २७ जण ठार झाले होते. त्यामुळे नक्षलवाद्यांविरोधात व्यापक मोहीम राबविली जात असताना एडेसमेटा येथे कारवाई झाली. परंतु या कारवाईत मारलेले नागरिक नक्षलवादी नसल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: लसीकरणामध्ये प्रगत राष्ट्रांपेक्षाही पुढे आहेत भारतातील 'ही' राज्ये

दरम्यानच्या काळात पोलिसांनी एडेसमेटा येथे नक्षलवादी नसल्याचे म्हटले होते, तर त्याचवेळी सीआरपीएफच्या कोब्रा पथकाने नक्षलवाद्यांच्या ठिकाणांचा भांडाफोड केल्याचा दावा केला होता. न्यायिक अहवालात म्हटले की, २५ ते ३० जण बीज मंडप नावाच्या आदिवासी सणासाठी एकत्र झाले होते. त्याठिकाणी एक हजार सुरक्षा कर्मचारी दाखल झाले.

जर सीआरपीएफच्या जवानाकडे सुरक्षेची पुरेशी साधन असती आणि त्यांच्याकडे आदिवासीसंबंधीची अचूक माहिती असती तर ही घटना टळली असती. जमावाने आपल्यावर हल्ला केल्याचे सुरक्षा दलाने म्हटलेले असताना दुसरीकडे तपासात मात्र सुरक्षा दलाला कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता, असे म्हटले आहे. सुरक्षा दलाने कारवाईचे निकष पाळले नाहीत, असा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे.

loading image
go to top