

Raj Thackeray
esakal
दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या निवडक युपीआय व्यापारी व्यवहारांवर ०.४ टक्के मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) लागू करण्याच्या निर्णयावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकारने भारतीयांना आधी युपीआय व्यवहारांची सवय लावली आणि आता शुल्काच्या माध्यमातून ‘डिजिटल सापळा’ लावला असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी सोशल मिडिया पोस्टमध्ये केला आहे.