

Raj Thackeray Targets Chief Election Commissioner Gyanesh Kumar
esakal
निवडणुक आयोगातील वाद आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर विरोधकांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी आज पुन्हा दुसऱ्यांदा ज्ञानेश कुमार आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना सोशल मिडिया पोस्टमध्ये मार्मिक टोला लगावण्याबरोबरच एसआयआर प्रक्रिया रद्द करुन बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.