Raja Raghuvanshi murder case honeymoon Meghalaya : इंदौर येथील नवविवाहित जोडपे राजा आणि सोनम रघुवंशी काही दिवसांपूर्वी मेघालयात हनीमूनसाठी गेले होते. मात्र, गेल्या 19 दिवसांपासून ते बेपत्ता होते. 2 जून रोजी राजाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला, तर सोनम बेपत्ता होती. आता पोलिसांनी सोनमला उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे अटक केली आहे.