ग्वाल्हेर/इंदूर : राजा रघुवंशी हत्येप्रकरणात (Raja Raghuvanshi Case) रोज नवे वळण समोर येत आहे. पोलिस तपासही आता अंतिम टप्प्यावर आला आहे. आतापर्यंत या प्रकरणात राजा रघुवंशीची पत्नी सोनम रघुवंशीसह (Sonam Raghuvanshi) सात आरोपींना अटक झाली आहे. आता लोकेंद्र तोमर या आठव्या संशयिताचं नाव पुढं आलं आहे, जो सोनमला हत्येनंतर लपवण्यासाठी मदत करत होता.