esakal | पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिषी रघुनाथ युमालांना अटक; अघोरी सल्ला दिल्याचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

आरोपीस अटक

पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिषी रघुनाथ युमालांना अटक

sakal_logo
By
नामदेव कुंभार

पुणे : शारीरिक व मानसिक अत्याचार करण्याबरोबरच सुनेला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी उद्योजकसह आठ जणांविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आता या प्रकरणाशी संबंध असल्याच्या कारणावरन एका उच्चभ्रू अध्यात्मिक गुरूला चतुःश्रृंगी पोलिसांनी शनिवारी अटक केली. रघुनाथ राजराम येमुल (वय 48, रा. धवलगिरी अपार्टमेंट, आयवरी इस्टेट, बाणेर) असे अटक केलेल्या गुरूजीचे नाव आहे. याप्रकरणात पती गणेश नानासाहेब गायकवाड (वय 36) याच्यासह सासरच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी 27 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. ही घटना 23 जानेवारी 2017 पासून गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली आहे.

रघुनाथ येमुल याने फिर्यादीचा पती गणेश गायकवाड यास "फिर्यादी ही अवदसा असुन पांढर्‍या पाय गुणांची आहे. तीची जन्मवेळ चुकीची आहे, त्यामुळे ग्रहमान दुषीत झाले आहेत. जर तुझी ही बायको म्हणु अशी कायम राहीली तर तु आमदार होणार नाही व मंत्री होणार नाहीस त्यामुळे तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे, मी देतो ते लिंबु उतरविल्यावर तुझ्या मागची पिडी कायमची निघुन जाईल" असे सांगितले. त्यानंतर पती गणेश याने फिर्यादीवरून लिंबू ओवाळून टाकल्याचा प्रकार घडला.  संसार मोडण्यासाठी अनिष्ठ रूढी परंपरा अघोरी कृत्याचा वापर झाल्याचे पुरवणी जबाबत फिर्यादीने नमूद केल्यानंतर येमुल गुरूजीस अटक करण्यात आली.

हेही वाचा: प्रीतम मुंडेंना डावलल्याने नाराजीचा स्फोट; भाजपमध्ये राजीनामासत्र

येमुल गुरुजींचे राजकीय, प्रशासकीय विभागात कनेक्शन

येमुल गुरूजींचे राजकीय पासून प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांशी नजीकचे संबंध आहेत.आपला हात पाहण्यासाठी अनेकजण गुरूजीच्या दरबारात हजेरी लावतात. त्यामुळे संबंधीत प्रकरणात गुरूजीला अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. गुरूजीला अटक केल्यानंतर त्याला ज्या पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते, तेथे त्याचे भक्त त्याला भेटण्याचा प्रयत्न करीत होते.

"चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यातील पती असलेल्या संशयीत आरेापीला येमुल गुरूजीने पत्नीचे पायगुण चांगले नसल्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर फिर्यादीचा कौटुंबिक छळ झाला. दरम्यान, येमुल गुरूजींचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात आल्यानंतर त्यांना अटक झाली आहे." - पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त.परिमंडळ 4

loading image