esakal | विदारक! नातवाला कोरोना नको, आजी-आजोबाची आत्महत्या

बोलून बातमी शोधा

विदारक! नातवाला कोरोना नको, आजी-आजोबाची आत्महत्या

विदारक! नातवाला कोरोना नको, आजी-आजोबाची आत्महत्या

sakal_logo
By
नामदेव कुंभार

कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवला आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. दोन आठवड्यांपासून देशात तीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. कोरोनाचा संसर्ग वेगानं होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहेत. राजस्थानच्या कोटामधून अतिशय विदारक बातमी समोर आली आहे. नातवाला संसर्ग होऊ नये म्हणून कोरोनाबाधित आजी-आजोबानी रेल्वेसमोर (Train) उडी घेत आत्महत्या केली.

रेल्वे पोलिसांनी (railway police) कोरोनाच्या नियमांनुसार(corona protocol), वद्ध दाम्पत्यांवर अंत्यसंस्कार केले आहेत. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे आजी-आजोबा घरीच विलगीकरणात होते. आपल्यामुळे नातवाला कोरोनाची लागण होईल, अशी भिती या वृद्ध दाम्पत्यांना होती. त्यामुळे या दाम्पत्यांनी टोकाचं पाऊ उचललं.

हेही वाचा: राजस्थान ठरले 'रॉयल', कोरोनाग्रस्तांसाठी दिले साडे सात कोटी

कोटामधील (KOTA) टापरी येथील रहिवाशी असलेले हीरालाल बैरवा (75) आणि शांतीबाई (70) या दाम्पत्यांनी रेल्वेसमोर आत्महत्या केली. दोघेही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तणावाखाली होते. त्यांनी घरीच क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला. मात्र आपल्यामुळे आपला नातू रोहित याला करोनाचा संसर्ग होणार नाही ना अशी चिंता त्यांना होती. बैरवा दाम्पत्यांनी कुटुंबीयांना कोणतीही कल्पना न देता घरातून पलायनं केलं. त्यानंतर रेल्वे पटरीवर जाऊन आत्महत्या केली.