Rajasthan Anti-conversion law
esakal
Rajasthan Anti-conversion law : राजस्थान विधानसभेने जबरदस्तीने धर्मांतर थांबवण्यासाठी आणलेले कठोर विधेयक मंजूर केले आहे. मंगळवारी (ता. ३ सप्टेंबर) हे विधेयक चर्चेशिवाय पारित करण्यात आले. विरोधी काँग्रेसने (Congress) या विधेयकावर गदारोळ केला होता. या कायद्यानुसार जबरदस्ती, लोभ, धमकी किंवा फसवणुकीच्या माध्यमातून केलेल्या धर्मांतरावर जन्मठेपेपर्यंत तुरुंगवास आणि ५० लाखांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते.