Rajasthan Assembly Election Results 2023 : राजस्थानात भाजपची सत्ता आल्यास कोण होणार मुख्यमंत्री? 'या' बड्या नेत्यांची नावं चर्चेत, 'योगी' आघाडीवर

राजस्थान निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) 110 ते 115 जागांवर आघाडीवर आहे. If BJP comes to power, who will be the Chief Minister?
Rajasthan Assembly Election Results 2023
Rajasthan Assembly Election Results 2023 esakal
Summary

भाजपनं राजस्थानची निवडणूक मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही चेहरा (नेता) पुढं न करता लढवली होती. 2003 पासून वसुंधरा राजे ह्या राजस्थानमध्ये भाजपचा चेहरा आहेत.

Rajasthan Assembly Election Results 2023 : राजस्थान निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) 110 ते 115 जागांवर आघाडीवर आहे. सुरुवातीच्या ट्रेंडचं रुपांतर निवडणुकीच्या निकालात केलं, तर भाजप पूर्ण बहुमतानं सरकार स्थापन करत असल्याचं दिसतं आहे.

भाजपनं राजस्थानची निवडणूक मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही चेहरा (नेता) पुढं न करता लढवली होती. 2003 पासून वसुंधरा राजे ह्या राजस्थानमध्ये भाजपचा चेहरा आहेत. मात्र, यावेळी पक्षानं त्यांचा चेहरा पुढं केला नाही.

Rajasthan Assembly Election Results 2023
Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE: राजस्थानमध्ये शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र गुढा पिछाडीवर; भाजपचे उमेदवार शुभकरन चौधरी 9000 मतांनी पुढे

राजस्थान निवडणुकीचे ट्रेंड येत असतानाच भाजपचं सरकार स्थापन झालं तर मुख्यमंत्री कोण होणार, अशी चर्चाही सुरू झाली आहे. वसुंधरा राजे (Vasundhara Raje) मुख्यमंत्री होणार की पक्ष नव्या चेहऱ्याला संधी देणार? याकडं लक्ष लागलंय. राजस्थानमध्ये भाजपचा सर्वात मोठा आणि लोकप्रिय चेहरा असलेल्या वसुंधरा यांचा फारसा प्रभाव दिसत नाहीये, त्यामुळे भाजप हायकमांड कोणाला मुख्यमंत्रीपदी विराजमान करणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

बालकनाथ

तिजारा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बालकनाथ (Mahant Balaknath) हे खासदार आहेत. अशोक गेहलोत यांच्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बालकनाथ हा दुसरा सर्वात लोकप्रिय चेहरा म्हणून समोर आले आहेत. इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये 10 टक्के लोकांनी मुख्यमंत्रिपदासाठी बालकनाथ यांना पहिली पसंती दिली होती. या एक्झिट पोलनुसार, बालकनाथ हे भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात लोकप्रिय चेहरा आहेत.

Rajasthan Assembly Election Results 2023
Rajasthan Election: राजस्थान विधानसभेच्या रिंगणात 1800 हून अधिक उमेदवार; महिला उमेदवारांची संख्या किती?

राजस्थानमधील अलवर येथील खासदार बालकनाथ हे नाथ पंथाचे आहेत. ज्यातून यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येतात. बालकनाथ हे रोहतकच्या बाबा मस्तनाथ मठाचे महंत आहेत. नाथ संप्रदायाच्या सध्याच्या व्यवस्थेमध्ये योगी आदित्यनाथ यांच्यानंतर बालकनाथ दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना राजस्थानचे योगी देखील म्हटले जाते.

दिया कुमारी

जयपूर राजघराण्यातील दिया कुमारी यांच्याकडंही वसुंधरा राजे सिंधिया यांचा पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. दिया कुमारी या खासदार असून यावेळी भाजपनं त्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारीही दिली होती. दिया कुमारी यांनी जयपूर जिल्ह्यातील विद्याधर नगर मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. ही जागा भाजपचा बालेकिल्ला मानली जाते.

माजी उपाध्यक्ष आणि राजस्थान भाजपचे पितामह भैरो सिंह शेखावत यांचे नातेवाईक नरपत सिंह राजवी हे या जागेवरून आमदार आहेत, पण यावेळी पक्षानं नरपत यांची ही जागा बदलली आणि दिया कुमारी यांना येथून तिकीट दिलं होतं. त्यामुळं या चर्चेला आणखी उधाण आलं आहे.

Rajasthan Assembly Election Results 2023
Rajasthan Election: खिशात रुपयाही नाही! राजस्थान निवडणुकीतले 'हे' आठ उमेदवार आहेत सर्वात गरीब

सीपी जोशी

राजस्थान भाजपचे अध्यक्ष सीपी जोशी यांचाही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत समावेश असल्याचं मानलं जात आहे. प्रदेशाध्यक्ष या नात्याने सीपी जोशी यांनी पक्षाच्या निवडणूक प्रचाराची धुरा हाती घेतली होती. सीपी जोशी हेही खासदार असून त्यांना प्रदेशाध्यक्ष बनवल्याने त्यांची हायकमांडशी जवळीक असल्याची चर्चाही सुरू झाली आहे.

'या' नेत्यांच्या नावांचीही चर्चा

राजस्थानमध्ये भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी वसुंधरा यांच्याशिवाय या तीन नेत्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यात गजेंद्र सिंह शेखावत, भूपेंद्र चौधरी यांच्यासह अन्य काही नेत्यांचाही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत समावेश आहे. अर्जुनराम मेघवाल, अश्विनी वैष्णव किंवा सुनील बन्सल यापैकी कोणत्याही बलाढ्य नेत्यांना राजस्थानची सत्ता हस्तगत करण्यासाठी जयपूरला पाठवू शकतं, असंही बोललं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com