'तुम्ही इथून निघून जा'; बिग बी स्पर्धकाला असं का म्हणाले? | KBC 13 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amitabh bachchan with kbc producar

'तुम्ही इथून निघून जा'; बिग बी स्पर्धकाला असं का म्हणाले?

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'कौन बनेगा करोडपती १३'च्या KBC 13नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये काही लहान मुलांना आमंत्रित करण्यात आलं होतं. बुधवारच्या या भागात अराधी गुप्ताने Aradhy Gupta सर्वांची मनं जिंकली. अराधीने मोठा झाल्यावर टेलिव्हिजन पत्रकार बनण्याची त्याची इच्छा अमिताभ बच्चन यांच्यासमोर व्यक्ती केली. इतकंच नव्हे तर त्याने मुलाखतीसाठी बिग बींसमोर विनंती केली. अराधीची ही इच्छा महानायकानेही पूर्ण केली आणि दोघं मुलाखतीसाठी समोरासमोर बसले.

अराधीने बिग बींना त्यांच्या बालपणाबद्दल, कामाबद्दल आणि त्यांची नात आराध्या बच्चनबद्दल अनेक प्रश्न विचारले. बिग बींनी अगदी मनमोकळेपणाने या प्रश्नांची उत्तर दिली. या मुलाखतीअखेर अराधीने बिग बींना त्यांच्या अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्सासोबतच्या टायअपबद्दल प्रश्न विचारला.

"तुमचा आवाज अलेक्सासाठी रेकॉर्ड करण्यात आला आहे. मग आता तुमच्या घरी जेव्हा जया काकू 'अ‍ॅलेक्सा एसी चालू कर' असं म्हणतात, तेव्हा अ‍ॅलेक्सा उत्तर देते की तुम्ही 'हो, मॅडम' म्हणता", असा गमतीशीर प्रश्न अराधीने बिग बींना विचारला. हा प्रश्न ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तर बिग बी नि:शब्द झाले. अराधीला ते पुढे म्हणाले, "मिस्टर टीव्ही जर्नलिस्ट, मला अजून ही मुलाखत द्यायची नाही. तुम्ही कृपया इथून निघून जा. तुम्ही कमालीचे प्रश्न विचारत आहात."

हेही वाचा: TRP यादीत 'ही' मालिका अग्रस्थानी; 'आई कुठे काय करते'ला टाकलं मागे

बिग बींचं हे उत्तर ऐकून प्रेक्षक टाळ्या वाजवू लागतात. अराधीच्या प्रश्नाचं उत्तर न टाळता ते पुढे म्हणतात, "आमच्या घरातील एसी हा अ‍ॅलेक्साला कनेक्टेड नाही. आम्ही स्वत: एसी चालू किंवा बंद करतो. त्यामुळे असं काही घडण्याची शक्यता फार कमी आहे." यावेळी अमिताभ यांना असंही विचारण्यात आलं की, त्यांच्या उंचीमुळे ते स्वतः त्यांच्या घरातील पंख्याची साफसफाई करतात का?

लहान मुलांसाठी समर्पित या एपिसोडमध्ये बिग बींनी त्यांच्या मजेशीर प्रश्नांची उत्तर गमतीशीर पद्धतीने दिली. या एपिसोडचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

loading image
go to top