Rajasthan Bhiwadi Factory Fire
esakal
Multiple explosions triggered deadly blaze in Khushkhera industrial area : राजस्थानमधील भिवाडी येथे एका केमिकल कारखान्यात स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. आज सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. कारखान्यात मोठ्या प्रमाणात केमिकल साठा असल्यामुळे आग वेगाने पसरल्याची प्राथमिक माहिती आहे.