भाजपने राजस्थानमध्ये एका आमदाराला किती पैसे देण्याचे ठरवले होते? गेहलोत म्हणतात...

सुशांत जाधव
बुधवार, 15 जुलै 2020

दिल्लीत बसलेल्या लोक प्रकाश झोतात येण्यासाठी काहीही करु शकतात, असेही गेहलोत यावेळी म्हणाले. भाजपने कितीही प्रयत्न केले तरी त्याचा उपयोग होणार नाही. आमच्याकडे बहुमत आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

जयपूर : भाजपने राजस्थानमध्ये एका आमदाराला जवळपास 20 कोटी रुपयांपर्यंत ऑफर दिली होती, असा गंभीर आरोप राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे.  कर्नाटक-मध्य प्रदेशसारखा खेळ करत राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे. यासाठी आमदारांना 20-20 कोटी रुपयांत खरेदी करण्याचा घोडेबाजार मांडला आहे. याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत, असेही ते म्हणाले. राजस्थामध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.   दिल्लीत बसलेल्या लोक प्रकाश झोतात येण्यासाठी काहीही करु शकतात, असेही गेहलोत यावेळी म्हणाले. भाजपने कितीही प्रयत्न केले तरी त्याचा उपयोग होणार नाही. आमच्याकडे बहुमत आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.  

चीन-अमेरिका संघर्ष आणखी तीव्र; डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला दणका

जोतिरादित्य सिंधिया यांच्यापाठोपाठ राजस्थामध्ये काँग्रेसला गळती लागल्याचे पाहायला मिळाले. सचिन पायलट यांच्या रुपात काँग्रेसने आणखी एक युना नेता गमावला, अशा प्रतिक्रियाही उमटत आहेत. जुन्या नव्या वादावरही गेहलोत यांनी यावेळी भाष्य केले. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह मला युवा पीढीवर विश्वास आहे. त्यांना संधी दिली नक्की मिळेल. सध्याच्या घडीचा युवा पैशासाठी काय करतोय हे लोकांना दिसत आहे. प्रसारमाध्यमांना हे कळत नाही का? असा प्रश्न उपस्थितीत करत बंडखोरी करणाऱ्या सचिन पायलट आणि अन्य नेत्यांवर त्यांनी निशाणा साधला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्या गटातील वाद चव्हाट्यावर आल्यानंतर राजस्थामधील काँग्रेस सरकार संकटात आल्याची चर्चा जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या काँग्रेसकडून बैठकाही सुरु झाल्या आहेत. पक्षाने सचिन पायलट यांच्याविरोधात कारवाई करत उपमुख्यमंत्री आणि राजस्थानच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन उचलबांगडी केली. एवढेच नाही तर त्यांच्यासोबत अन्य दोन मंत्र्यावरही कारवाई करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajasthan chief minister ashok gehlot talk over sachin pilot and accuses BJP of horse trading