काँग्रेस शोधतेय राहुल गांधींना पर्याय; अध्यक्षपदाच्या शर्यतीत ज्येष्ठ नेता

Rahul_Sonia_Gandhi
Rahul_Sonia_Gandhi

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अद्यापही काँग्रेसला अध्यक्षपदासाठी उमेदवार मिळालेला नाही. त्यामुळे सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा आपल्या हाती घेतली. अध्यक्ष निवडण्यासाठी अनेक बैठका घेण्यात आल्या पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. राहुल गांधी यांची मनधरणी करण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश आलं आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या जवळचे मानले जाणारे नेते आणि सध्याचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. 

अमर उजाला या हिंदी वृत्तवाहिनीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. गेहलोत यांना राजस्थानमधून दिल्लीत बोलावून त्यांच्याकडे अध्यक्षपद सोपवण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसच्या एका गटाने दिली आहे. अशा परिस्थितीत पक्षाला स्थायी अध्यक्षाची गरज असून सोनिया गांधींनी ती जबाबदारी पार पाडावी, असं या गटाचं म्हणणं आहे. त्यामुळे सोनिया गांधी ही जबाबदारी स्वीकारणार की अजून कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

गांधी परिवारच्या जवळचे आणि विश्वासू
अशोक गेहलोत हे गांधी परिवाराच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते मानले जातात. सोनिया गांधींचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. राजस्थान निवडणुकीत विजयी झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी पहिली पसंती सचिन पायलट यांना होती. पण नंतर अनुभवी अशोक गेहलोत यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. आता काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेल्या नावांपैकी सर्वाधिक अनुभवी हे गेहलोत असल्याने त्यांच्याच नावाची जोरदार चर्चा आहे. नव्या आणि जुन्या नेत्यांमध्ये समतोल राखण्यात गेहलोत तरबेज आहेत. 

गेहलोत यांच्या पक्षात अध्यक्षपदाचा चेंडू
गेल्या वर्षी गेहलोत यांना अध्यक्षपदासाठी प्रस्ताव देण्यात आला होता. पण राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी ते राजी नव्हते. दिल्लीला जायचं की नाही हा निर्णय आताही गेहलोत यांच्या पक्षात आहे. पण ते सध्या मंत्रिमंडळ विस्तारात गुंतले आहेत. 

जेव्हा गहलोत यांनी सिब्बल यांना सल्ला दिला
बिहार विधानसभा निवडणूक निकालानंतर कॉंग्रेस पक्षातील वाद-विवाद चव्हाट्यावर आले. ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याचवेळी पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांनीही पराभवाबद्दल आपले मत व्यक्त केले होते. त्यावर गहलोत यांनी सिब्बल यांना सल्ला दिला होता. गहलोत म्हणाले होते की, पक्षाच्या अंतर्गत विषयांवर जाहीर चर्चा करू नये, नेतृत्त्वावर विश्वास ठेवावा.

वरिष्ठ नेत्यांचे सोनिया यांना पत्र 
गेल्या वर्षी कॉंग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पक्ष नेतृत्वाबाबत पत्र लिहिले होते. हे पत्र कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वात लिहिले गेले होते आणि त्यावर २३ नेत्यांच्या स्वाक्षऱ्या केल्या होत्या. या नेत्यांमध्ये कपिल सिब्बल, आनंद शर्मा या नेत्यांचा समावेश होता. या 'लेटर बॉम्ब' नंतर कॉंग्रेसमध्ये खळबळ उडाली, त्यानंतर सीडब्ल्यूसीची बैठक तडकाफडकी बोलावली गेली आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह असहमत नेत्यांचे मत वळविण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com