अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या भाषणाचा इतिहास; कुणी किती शब्दांत आणि मिनिटांत भाषण आटोपलं?

टीम ई-सकाळ
Wednesday, 20 January 2021

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून आतापर्यंत ज्यांनी शपथ घेतली आहे, त्यांनी अध्यक्ष म्हणून केलेल्या पहिल्या भाषणाचीही चर्चा होत असते.

US 46th President Oath Ceremony : वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथ सोहळ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष्य लागलं आहे. जो बायडेन अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निरोपीय भाषणात कुटुंबीय आणि मित्रांचे आभार मानले. व्हाईट हाऊस सोडल्यानंतर त्यांना वॉशिंग्टन विमानतळावर गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. 

शपथ घेण्यापूर्वी जो बायडेन यांनी 'अमेरिकेसाठी एक नवा दिवस' अशा आशयाचं ट्विट केलं आहे. 1973 मध्ये बायडेन हे सर्वात युवा सीनेटर म्हणून डेलायवेअरमधून निवडून आले होते. बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची तर कमला हॅरिस यांनी देशातील पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. त्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला आहेत, ज्या अमेरिकेसारख्या शक्तिशाली राष्ट्राच्या दुसऱ्या ताकदवार पदावर विराजमान होतील. 

ट्रम्प यांचं फेअरवेल स्पीच; अखेरच्या भाषणात 'US कॅपिटॉल' हिंसेचा निषेध, पुढील प्रशासनाला सदिच्छा

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून आतापर्यंत ज्यांनी शपथ घेतली आहे, त्यांनी अध्यक्ष म्हणून केलेल्या पहिल्या भाषणाचीही चर्चा होत असते. कुणी सर्वात मोठे भाषण केले, कुणी थोडक्यात भाषण केले याची उत्सुकता अनेकांना आहे. अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या भाषणाबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊया.

भाषणाचा वाढता वेळ
१९४० ते १९८० या काळात अध्यक्षांच्या भाषणात सरासरी १६१२ शब्दांचा वापर झाला आहे. १९८० ते २०१३ या काळात ही संख्या वाढून २१२० शब्दांवर पोचली. २०१३ मध्ये ओबामा यांचे भाषण २० मिनिटांचे होते. यात दोन हजार शब्दांचा समावेश होता.

टीम इंडियाच्या कसोटी विजयानंतर मोदींचा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना रिप्लाय​

सर्वात मोठे भाषण
१८४१ रोजी विल्यम हेन्री हॅरिसन यांचे भाषण सर्वात दीर्घकाळाचे ठरले. त्यांनी १ तास ४५ मिनिटे भाषण केले आणि त्यात ८४४५ शब्दांचा समावेश होता. कडाक्याच्या थंडीत हॅट आणि कोट याचा पेहराव न करता त्यांनी भाषण केले. त्यानंतर त्यांना न्यूमोनिया झाला. अध्यक्ष झाल्यानंतर महिनाभरात त्यांचे निधन झाले.

सर्वात लहान भाषण
पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे भाषण सर्वात कमी काळाचे ठरले. त्यांनी १७९३ मध्ये केवळ १३५ शब्दांचा वापर केला.

टिव्हीवरचे पाहिलेले पहिले भाषण
१९४९ रोजी अध्यक्ष हॅरी एस ट्रुमन यांचे भाषण दूरचित्रवाणीवरून पहिल्यांदा प्रसारित करण्यात आले. त्यावेळी अमेरिकेत केवळ ४४ हजार टिव्ही संच होते.

'अलीबाबा'चे जॅक मा सापडले! गेल्या 2 महिन्यांपासून होते रहस्यमयरित्या बेपत्ता​

बायडेन यांची पस्तीस शब्दांत शपथ
अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष ज्यो बायडेन हे ३५ शब्दांत शपथ घेतली. कॅपिटॉल हिल येथे आयोजित सोहळ्यात भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता डेमोक्रॅट जोसेफ आर. बायडेन ज्युनिअर म्हणजेच ज्यो बायडेन यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली.

युवा सिनेटर ते अध्यक्ष
अत्यंत तरुण वयात आपल्या राजकीय किरकिर्दीची सुरुवात करणारे ज्यो बायडेन (वय ७८) हे अमेरिकेचे सर्वाधिक वयाचे अध्यक्ष म्हणून विराजमान झाले आहेत. तब्बल पाच दशकांच्या राजकीय प्रवासानंतर ते सर्वोच्च स्थानी येऊन पोहोचले आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या बायडेन यांनी १९८८ आणि २००८ अशा दोन वेळेस अध्यक्षपदासाठी प्रयत्न केले होते. यंदा मात्र त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना धूळ चारत हे पद मिळविले. आपल्या राजकीय प्रवासात बायडेन यांनी सहा वेळा सिनेटर म्हणून काम पाहिले होते. बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात (२००८ ते २०१६) त्यांनी उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. 

सर्वार्थाने पहिल्या...
अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेल्या कमला हॅरिस यांनी इतिहास घडविला आहे. या पदावर येणाऱ्या पहिल्या महिला, पहिल्या आफ्रिकी वंशाच्या व्यक्ती आणि पहिल्या भारतीय वंशाच्या व्यक्ती ठरल्या आहेत. कायद्याचे शिक्षण घेतलेल्या हॅरिस यांनी अनेक टप्पे पार करत कॅलिफोर्नियाच्या ॲटर्नी जनरलपदापर्यंत मजल मारली होती.

- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Joe Biden Inauguration Joe Biden and Kamala Harris take oath President and Vice president respectively