काँग्रेसने डाव हाणून पाडला; भाजप आता नवी रणनिती आखणार?

rajasthan congress truce bjp forced to rework on its strategy
rajasthan congress truce bjp forced to rework on its strategy

जयपुर : राजस्थान (Rajasthan) विधानसभेचे अधिवेशन उद्यापासून चालू होणार आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje) आणि भाजप (BJP) नेत्यांनी आज (ता. १३) गुरुवारी एक बैठक आयोजित केली होती. कांग्रेस (Congress)मधील अंतर्गत कलहावर भाजप नेत्यांची ही पहिलीच बैठक होती. ती अखेर रद्द करण्यात आली. सोमवारी सचिन पायलट (Sachin Pilot)ने आपल्या समर्थक आमदारांसोबत घरवापसी करत असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे राजस्थानातील अशोक गेहलोत सरकारवरील संकट काही काळासाठी तरी नाहीसे झाले. त्यामुळे भाजपचा काँग्रेस सरकार पाडण्याचा डाव फसला. मात्र, तरीही भाजप शांत बसण्याची शक्यता नसून नवी रणनिती आखण्याच्या तयारीत असल्याचे आज बैठक घेण्याच्या हालचालीवरून दिसून आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जुलैमध्ये सचिन पायलट यांनी काँग्रेस पक्षाविरोधात बंडखोरी करत २५ आमदारांना घेऊन दिल्ली गाठली होती. त्यावेळी भारतीय जनता पक्षाकडून एक बैठक बोलविण्यात आली होती. मात्र, ती नंतर रद्द करण्यात आली. या बैठकीत वसुंधरा राजेंच्या उपस्थितीचा कुठलाही अंदाज नव्हता. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या मदतीशिवाय काँग्रेस सरकार धक्का लावणे हे शक्य नव्हते. पायलट यांच्या बंडखोरीनंतरही अशोक गेहलोत त्यांच्याकडे बहुमत असल्याचा दावा करत राहिले. त्यामुळे भाजपने काँग्रेस सरकारला पाडण्यासाठी खास असे कोणतीही प्रयत्न केले नसले तरी, भाजपकडून सर्व प्रकारच्या गोष्टींचा अंदाज घेण्यात आला होता. 

राजस्थानमध्ये भाजपकडे एकूण ७२ आमदार आहेत. भारतीय जनता पक्षाला राजस्थानमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी आणखी जवळपास ३० आमदारांची गरज होती. पायलट गटाकडून सातत्याने त्यांच्याकडे ३० आमदार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, हा आकडा केवळ १९ होता हे भाजपच्या लक्षात आल्याने प्रयत्न फसणार असल्याची चर्चा भाजपच्या गोटात मोठ्या प्रमाणात होऊ लागली आणि आमदारांचा घोडेबाजार करण्याचेही भाजपकडून टाळण्यात आले. त्यानंतर सचिन पायलट आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यात बैठक झाली आणि पायलट गटाला मनविण्यात प्रियांका गांधी यांना यश आल्याने भाजपचे राजस्थानात सरकार स्थापन करण्याचे स्वप्न भंगले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com