एकतर्फी प्रेमातून महिलेचा खून केला आणि तासभर...

Rajasthan
Rajasthanesakal
Summary

प्रियकरानं महिलेच्या खांद्यावर, मानेवर आणि शरीराच्या इतर भागावर इतके वार केले, की तेथील जमीन रक्तानं माखलीय.

जालोर : राजस्थानच्या (Rajasthan) जालोर जिल्ह्यात हृदयद्रावक खून झाल्याची घटना उघडकीस आलीय. जालोरच्या आहोर परिसरात एकतर्फी प्रेमातून (One Sided Love) प्रियकरानं एका महिलेवर कुऱ्हाडीनं जोरदार वार करुन तिची हत्या केलीय. त्या महिलेचा जोपर्यंत श्वास सुरु होता, तोपर्यंत त्यानं तिच्यावर कुऱ्हाडीने वार सुरूच ठेवले. या प्रियकरानं महिलेच्या खांद्यावर, मानेवर आणि शरीराच्या इतर भागावर इतके वार केले, की तेथील जमीन रक्तानं माखलीय. या हत्येनंतर आरोपी त्या मृतदेहाला लपेटल्याचंही समोर आलंय. पोलिसांनी त्या वेड्या प्रियकराला नुकतीच अटक केलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, शांती देवी यांना दोन मुलं आहेत. ती इथं सासरच्यांसोबत राहायची. या महिलेचा पती शांतीलाल महाराष्ट्रात काम करतो. दरम्यान, मनरेगाच्या कामासाठी शांतीदेवी रविवारी जोजावर नदीवर गेल्या होत्या. याच दरम्यान गावात राहणारा 21 वर्षीय गणेश मीना हा तिथं पोहोचला आणि त्यानं शांतीदेवीवर प्रेम असल्याचं सांगितलं. शांतीदेवीनं त्याच्या प्रेमाला नकार दिल्यानं रागाच्या भरात गणेशनं तिच्यावर कुऱ्हाडीने जोरदार वार केले. हा आरोपी कुऱ्हाड फिरवत म्हणाला, आज मी तुलाच सोडणार नाही, मी तुला ठार मारणार.. असं तो ओरडत राहिला. या महिलेचा गळा चिरल्यानंतरही कुऱ्हाडीने तो सपासप वार करत राहिला.

Rajasthan
तालिबान्यांनी केलेल्या गोळीबारात 17 नागरिक ठार

आरोपी मृतदेहाला कवटाळून राहिला

या विचित्र हल्ल्यानं शांती देवी यांचा जागीच मृत्यू झाला. इतर मनरेगा कामगारांनीही तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, गणेशनं त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेच्या मृत्यूनंतरही आरोपीचा तमाशा थांबत नव्हता. तिची हत्या केल्यानंतर, तो त्या महिलेच्या मृतदेहाला कवटाळून राहिला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी पोहोचले. त्यानंतरही आरोपी मृतदेहाला सोडत नव्हता. पोलिसांनी त्याला अटक केली असून मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Rajasthan
जगातील मुस्लिमांसह भारतातील मुसलमान पाकिस्तानी संघासोबत होते

एकतर्फी प्रेमातून महिलेचा बळी

पोलिसांनी सांगितलं, की या प्रकरणातील आरोपी गणेश मीना हा थांवला गावचा रहिवासी आहे. त्याला अटक करण्यात आलीय. आरोपीचं महिलेवर एकतर्फी प्रेम होतं. तो शांतीदेवीला अनेक महिन्यांपासून त्रास देत होता. शांतीदेवी यांनी पती शांतीलाल चौधरी यांनाही याबाबत सांगितलं होतं. त्यांच्या पतीनं आरोपी गणेश मीनालाही समजावून सांगितलं, पण तो ऐकायला तयार नव्हता आणि त्यानं टोकाचं पाऊल उचलत तिला ठार मारलं. याप्रकरणी महिलेचा मेहुणा गोमाराम चौधरी यांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com