Rajasthan Accident Kills 10 Devotees : राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात आज (बुधवार) सकाळी एक भीषण रस्ता अपघात झाला. खातुश्याम मंदिरात (Khatu Shyam Temple) दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप वाहनाला मोठ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात १० जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यात ७ लहान मुलं आणि ३ महिलांचा समावेश आहे. अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.