बिचाऱ्याने बायकोच्या हत्येप्रकरणी भोगला ७ वर्षे कारावास अन् बायको परपुरुषाबरोबर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajasthan

बिचाऱ्याने बायकोच्या हत्येप्रकरणी भोगला ७ वर्षे कारावास अन् बायको परपुरुषाबरोबर...

Rajasthan: राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पत्नीच्या हत्येप्रकरणी 7 वर्षे शिक्षा भोगत असलेल्या पतीला तुरुंगातून बाहेर येताच पत्नी जिवंत सापडली. पत्नी जिवंत असल्याचे समजताच कुटुंबात आणि पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. कुटुबीयांनी पत्नीची सर्व कागदपत्रे आणि रेकॉर्ड पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. हे प्रकरण राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील आहे. येथे मथुरेतील कोसी येथे राहणारी आरती राजस्थानातील मेहंदीपूर बालाजी येथे आली होती. इथे ती छोटं-मोठं कामकरून राहत होती. दरम्यान, तिची राजस्थानमधील दौसा येथील रहिवासी सोनू सैनी याच्याशी भेट झाली.

हेही वाचा: Nitesh Rane: शिंदे गट-भाजपातले मतभेद चव्हाट्यावर; नेत्याने नितेश राणेंना सुनावलं!

दोघे प्रेमात पडले आणि सप्टेंबर 2015 मध्ये त्यांनी लग्न केले, परंतु लग्नानंतर केवळ आठ दिवसांनी आरती सोनूच्या घरातून गायब झाली. सोनूला तिच्याबद्दल काहीच न सापडल्याने त्याने आरतीच्या कुटुंबीयांना माहिती दिली. 25 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे एका महिलेचा मृतदेह सापडला होता, ज्याची ओळख पत्नीच्या वडिलांनी आरती म्हणून केली होती.

आरतीच्या वडिलांनी सोनू सैनी आणि त्याच्या एका मित्रावर आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी पती सोनू सैनी आणि त्याच्या एका मित्राला अटक करून या प्रकरणाचे रूपांतर हत्येमध्ये केले. पीडिताचा आरोप आहे की पोलिसांनी मार्च 2016 मध्ये त्याला आणि त्याच्या मित्राला अटक केली होती.

हेही वाचा: Pune News: पुण्यातील चक्काजाम आंदोलन भोवलं; ३७ रिक्षा चालकांना अटक

तो स्वत:ला निर्दोष म्हणत राहिला, मात्र पोलिसांनी त्याला मारहाण केली आणि खुनाचा गुन्हा कबूल करण्यास भाग पाडले. पीडिताने सांगितले की, त्याला पकडणाऱ्याला पोलिस विभागाकडून 15 हजार रुपयांचे बक्षीसही देण्यात आले होते. पोलिसांनी खोट्या प्रकरणात अडकवून पीडितेचे घर, जमीन आणि सर्व काही विकले.

आता त्याच्यावर त्यांच्यावर 20 लाखांचे कर्ज झाले आहे. जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याला समजले की त्याची पत्नी जिवंत आहे. त्यानंतर दोन्ही पीडितांच्या विनंती वरीन पोलिसांनी महिलेचा शोध घेतला तेव्हा ती तिचा दुसरा पती भगवान सिंग रेबारीसोबत बैजूपारा पोलीस स्टेशन हद्दीतील विशाल गावात आढळून आली.

होही वाचा-इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

यानंतर दौसा पोलिसांनी वृंदावन पोलीस ठाण्यात माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर दौसा येथे पोहोचलो. युपी पोलीसही महिलेला जिवंत पाहून आश्चर्यचकित झाले आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. वृंदावन पोलीस ठाण्यात आरती नावाच्या महिलेच्या हत्येचा गुन्हा खोटा असून ती महिला जिवंत असल्याची पुष्टी करण्यात आली.

टॅग्स :RajasthanpolicecrimeUP