Rajasthan Election: ‘निवडणुकीच्या काळातच छापे कसे?’, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला प्रश्न

‘‘आचारसंहिता लागू असतानाही मोदी सरकार ‘ईडी’ व ‘सीबीआय’च्या माध्यमांतून कारवाई करत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप
Rajasthan Election
Rajasthan ElectionEsakal
Updated on

राजस्थानसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. 

अशातच राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ‘‘विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सक्तवसुली संचालनालय (ईडी) व केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यांना हाताशी धरून विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या घरांवर व संस्थांवर मोदी सरकार करत असलेली कारवाई शिष्टाचार व आचारसंहितेला धरून नाही. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा विरोधकांना शत्रुत्वाच्या नजरेने पाहत आहेत,’’ असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज दिल्लीत केला.

Rajasthan Election
Rajasthan Polls: मला मुख्यमंत्रीपद सोडायची इच्छा आहे, पण...; अशोक गेहलोतांनी सचिन पायलट यांना खिजवलं

गेहलोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सचिन पायलट, वसुंधरा राजे, पक्षातील विद्रोह व अन्य विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. ते म्हणाले, ‘‘आचारसंहिता लागू असतानाही मोदी सरकार ‘ईडी’ व ‘सीबीआय’च्या माध्यमांतून कारवाई करत विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहे.

Rajasthan Election
Rajasthan Election: काँग्रेसमध्ये दिलजमाई; तर भाजपात असंतोष, निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता

हा प्रकार पूर्वी कधीही झाला नव्हता. यापूर्वी इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांचे स्नेहपूर्ण संबंध होते. राजीव गांधी यांनीही हाच वारसा पुढे चालविला. परंतु आता असे सौहार्दाचे संबंध संपले आहेत. मोदी व शहा हे विरोधकांना नेस्तनाबूत करण्याच्या मागे लागले आहे. ’’

माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याशीही स्नेह असल्याचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी मान्य केले.

Rajasthan Election
Mahua Moitra: मोदींची प्रतिमा मलिन करण्यासाठीच अदानींवर टीका; दर्शन हिरानंदानींच्या दाव्यामुळे महुआ मोईत्रा अडचणीत

मला मुख्यमंत्रीपद सोडायची इच्छा आहे, पण...

मला राजस्थानचे मुख्यंमत्रीपद सोडायचं आहे, पण हे पदच मला सोडायला तयार नाही, असं ते म्हणाले आहेत. असं वक्तव्य करुन त्यांनी सचिन पायलट यांना खिजवल्याचं बोललं जातंय.

एका महिलेने मला सांगितलं की, देवाची इच्छा आहे तुम्ही चौथ्यांना मुख्यमंत्री व्हावं. मी तेव्हा त्यांना सांगितलं की मला मुख्यमंत्रीपद सोडायचं आहे, पण मुख्यमंत्री पदच मला सोडत नाहीये. आणि भविष्यातही हे पद मला सोडेल असं वाटत नाही, असं अशोक गेहलोत म्हणाले. राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी तेच उमेदवार असतील हे त्यांनी या वक्तव्यातून जाहीर केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com