मोरांनी केले शेतीचे नुकसान; विष देऊन घेतला 23 मोरांचा जीव

वृत्तसंस्था
Wednesday, 25 December 2019

शेतकरी दिनेशसिंह चामर याने आपल्या शेतीचे नुकसान केल्याने त्याने हे कृत्य केले. त्याने विषामध्ये बुडवून बियाणे आपल्या शेतात ठेवली. ती बियाणे खाल्यानंतर सुमारे 23 मोरांचा तडफडून मृत्यू झाला आहे.

बिकानेर : राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील सेरूना गावात मोरांना शेतीचे मोठे नुकसान केल्याने शेतकऱ्याने विष देऊन 23 मोरांना मारल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, शेतकऱ्याला अटक केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी दिनेशसिंह चामर याने आपल्या शेतीचे नुकसान केल्याने त्याने हे कृत्य केले. त्याने विषामध्ये बुडवून बियाणे आपल्या शेतात ठेवली. ती बियाणे खाल्यानंतर सुमारे 23 मोरांचा तडफडून मृत्यू झाला आहे. तपासणीदरम्यान शेतामध्ये सापडलेल्या बियाणांत विष आढळून आले आहे.

या टिकटॉक गर्लनं लावलं जगाला वेड

गावकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. 23 मोरांसह काही कोंबड्या आणि उंदिरही बियाणे खाल्याने मृत्यू झाला आहे. या शेतकऱ्यांना वन्यजीव कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. वन अधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajasthan farmer held for poisoning 23 peacocks