राजस्थानातील सत्तासंघर्ष; 'या' दिवशी होऊ शकते फ्लोअर टेस्ट

टीम ई सकाळ
Sunday, 19 July 2020

राजस्थानमधील सत्तासंघर्ष आता एका वेगळ्याच वळणावर आला असून बुधवारी किंवा गुरुवारी फ्लोअर टेस्ट होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेऊन बहुमताचा दावा केला आहे. त्यामुळे सरकार बुधवारी किंवा गुरुवारी विधानसभेचे अधिवेशन बोलवू शकते आणि यावेळी फ्लोर टेस्ट होऊ शकते.

जयपूर : राजस्थानमधील सत्तासंघर्ष आता एका वेगळ्याच वळणावर आला असून बुधवारी किंवा गुरुवारी फ्लोअर टेस्ट होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेऊन बहुमताचा दावा केला आहे. त्यामुळे सरकार बुधवारी किंवा गुरुवारी विधानसभेचे अधिवेशन बोलवू शकते आणि यावेळी फ्लोर टेस्ट होऊ शकते.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राजस्थानच्या राजकारणात आता जयपूरमधील हॉटेल फेअरमाउंट येथे गेहलोट कॅम्पच्या आमदारांना मुगले आजम हा चित्रपट दाखवला. त्यानंतर लगान हा चित्रपट दाखविण्यात आला. इतकेच नाही तर महिला आमदारांनी हॉटेलच्या स्वयंपाकघरातल्या आचारीकडून स्वयंपाकाचे धडे ही घेतले. हॉटेलमध्ये असं चित्र आहे, पण राजस्थानमध्ये अजूनही सत्तेच्या युद्धाचे चित्र आहे.
-----------
उत्तर भारताला पावसाचा जोरदार तडाखा; आसाममध्ये पूर
------------
राजस्थानच्या राजकारणात नवा ट्विस्ट; गृह खात्याने मागितले फोन टॅपिंग प्रकरणाचे रिपोर्ट
-------------
केंद्रीय गृह मंत्रालय घोडे बाजाराच्या संबंधित कथित फोन टॅपिंग प्रकरणात सक्रिय झाले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयही वेगाने बदलणार्‍या राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय झाले आहे. गृहमंत्रालयाने राजस्थानच्या मुख्य सचिवांना फोन टॅपिंग प्रकरणी अहवाल देण्यास सांगितले आहे. राजस्थानच्या फोन टॅपिंग प्रकरणात केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिवांकडे अहवाल मागविला आहे. मुख्य सचिव राजीव यांचे म्हणणे आहे की, त्यांना फोन टॅपिंगची माहिती नाही. फोन टॅप करण्याबाबत त्यांच्याकडे कोणतीही तक्रार नाही.

दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गेहलोत यांनी राज्यपालांना सांगितले आहे की त्यांना आमदारांचा पाठिंबा आहे आणि सरकार पूर्णपणे स्थिर आहे. सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभेचे अधिवेशन बुधवार-गुरूवारी बोलावले जाऊ शकते. या सत्रात फ्लोर टेस्ट होऊ शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajasthan Floor Test Next Week? Buzz After Ashok Gehlot Meets Governor