
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे यांनी अकबर आणि जोधाबाई यांच्या लग्नाबाबत विधान करून एका नवीन वादाला जन्म दिला आहे. राज्यपालांनी अकबरनामाचा हवाला देत म्हटले की, अकबरने त्यात त्यांच्या लग्नाचा कोणताही उल्लेख केलेला नाही. अकबराच्या आमेर राजकुमारी जोधाबाई यांच्याशी झालेल्या लग्नाची कहाणी खोटी आहे. आमेरचा राजा भारमल याने मुघल सम्राट अकबराचे लग्न त्याच्या एका दासीच्या मुलीशी लावले. अकबराचे लग्न राजकुमारीशी झाले नव्हते.