High Court live in verdict
esakal
विवाहाचं कायदेशीर वय पूर्ण झाले नसेल तर तरीही दोन व्यक्ती लीव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू शकतात, असा निर्णय राजस्थान उच्च न्यायालयाने दिले आहे. एका प्रकरणाच्या सुनावणी वेळी उच्च न्यायालयाने ही टीप्पणी केली आहे. खरं तर कायद्यानुसार देशात मुलींसाठी विवाहाचं वय १८ तर मुलाचं २१ वर्ष निश्चित करण्यात आलं आहे. मात्र, तरीही न्यायालयाने अशाप्रकारे निर्णय दिल्याने विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. जस्टिस अनुप कुमार ढांड यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.