Jaipur Sawai Man Singh Hospital Fire
esakal
राजस्थानच्या जयपूरमधील सवाई मान सिंह रुग्णालयात सोमवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीच्या दुर्घटनेत सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आगीचा भडका उडाला होता. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे आग लागल्यानंतर डॉक्टरांनी रुग्णांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आता रुग्णांच्या नातेवाईकांकडून केला जातो आहे.