Crime News : घराच्या छतावर निळ्या ड्रममध्ये मृतदेह, मिठात पुरलेला हंसराम! पत्नी, तीन मुले अन् घरमालकाचा मुलगा गायब, नेमकं काय घडलं ?

Blue Drum Murder : तो गेल्या ६ महिन्यांपासून आदर्श कॉलनीत भाड्याच्या घरात पत्नी आणि ३ मुलांसह राहत होता. तो स्थानिक किराणा दुकानात काम करायचा. शनिवारी रात्री घरमालकीणीला घराचा दरवाजा उघडा दिसला.
Police officials recover a 35-year-old man’s body from a blue plastic drum filled with salt on a house rooftop in Khairthal-Tijara, Rajasthan.
Police officials recover a 35-year-old man’s body from a blue plastic drum filled with salt on a house rooftop in Khairthal-Tijara, Rajasthan.esakal
Updated on

Summary

  1. राजस्थानातील खैरथल-तिजारा येथे ३५ वर्षीय हंसरामचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये मीठासह आढळला.

  2. घटनेनंतर हंसरामची पत्नी, तीन मुले आणि घरमालकाचा मुलगा रहस्यमयरीत्या बेपत्ता आहेत.

  3. पोलिस तपास सुरू असून एफएसएल टीमने पुरावे गोळा केले आहेत; प्रकरण "मेरठ ब्लू ड्रम हत्याकांड"शी साधर्म्य दाखवते.

राजस्थानमधील खैरथल-तिजारा येथे उत्तर प्रदेशातील मेरठ शहरात प्रसिद्ध "ब्लू ड्रम मुस्कान" सारखाच आणखी एक हृदयद्रावक प्रकार उघडकीस आला आहे. हे रविवारी एका घराच्या छतावर ठेवलेल्या निळ्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये ३५ वर्षीय तरुण हंसरामचा मृतदेह सापडला. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. या खळबळजनक घटनेने लोकांना मेरठच्या निळ्या ड्रम प्रकरणाची आठवण करून दिली. ज्यामध्ये पत्नीने तिच्या पतीची हत्या केली आणि त्याचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये भरला. या तरुणाची पत्नी आणि मुले यांच्यासह घर मालकाचा मुलगाही बेपत्ता आहे. यामुळे या प्रकरणाचे रहस्य आणखी वाढले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com