प्रियकर-प्रेयसीला विवस्त्र करून मारहाण; व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था
बुधवार, 19 एप्रिल 2017

बांसवाडा (राजस्थान)- शंभूपुरा गावामध्ये प्रियकर व प्रेयसीला विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला असून, नेटिझन्सनने टीका केली आहे.

बांसवाडा (राजस्थान)- शंभूपुरा गावामध्ये प्रियकर व प्रेयसीला विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला असून, नेटिझन्सनने टीका केली आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'गावामधील एक युवक व युवतीचे प्रेमसंबंध होते. पंधरा दिवसांपूर्वी दोघे गाव सोडून पळून गेले होते. युवतीच्या घरच्यांनी  गुजरातमधून दोघांना 16 एप्रिल रोजी पकडून आणण्यात आले होते. गावामध्ये आणल्यानंतर दोघांना विवस्त्र करून प्रमाणात मारहाण करण्यात आली. शिवाय, विवस्त्र अवस्थेतच गावातून त्यांना फिरविण्यात आले. दोघांना विवस्त्र करून मारहाण होत असताना गावामधील कोणीही त्यांना सोडविण्याचा प्रयत्न केला नाही. संबंधित व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.'

'सोशल नेटवर्किंगवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिस तपास करत असल्याचे समजल्यानंतर युवतीच्या घरचे बेपत्ता झाले आहेत. याबाबत पुढील तपास सुरू आहे,' अशी माहिती पोलिस अधिक्षक आनंद शर्मा यांनी दिली.

Web Title: rajasthan: naked video viral of couple family absconding