राजस्थानात पेट्रोलची शंभरी

Petrol
Petrol

श्रीगंगानगरमध्ये सर्वांत महाग, महाराष्ट्र, मध्य प्रदेशात दरवाढ
नवी दिल्ली - आज सलग नवव्या दिवशी देशातील इंधन दरवाढ सुरूच होती. राजस्थानातील श्रीगंगानगर जिल्ह्यात पेट्रोलची किंमत १००.१६ रुपयांवर पोचली होती. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये आज २५ पैशांनी वाढ झाली आहे. सर्वाधिक कर असलेल्या ब्रँडेड पेट्रोलचे दर अनेक ठिकाणी शंभरीजवळ पोहोचले आहेत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यात महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि राजस्थान या तीन राज्यांचा समावेश आहे. स्थानिक करांचे प्रमाण अनेक ठिकाणांवर वेगवेगळे असल्याने  तिथे पेट्रोलच्या किमतींमध्येही मोठी तफावत दिसून येते. राजस्थान सरकार हे पेट्रोलवर सर्वाधिक व्हॅट आकारते त्यामुळे तिथे पेट्रोलची किंमत अधिक आहे. मध्यप्रदेशातील अनुप्पूर येथे पेट्रोलचा दर प्रति एक लिटरला ९९.९० रुपयांवर पोचला होता तर डिझेलच्या दराने ९०.३५ रुपयांची पातळी गाठली. दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत ८९.५४ रुपये एवढी होती तर मुंबईमध्ये हा दर ९६ रुपये प्रतिलिटवर पोचला होता.

म्हणून श्रीगंगानगर महाग
जयपूर- जोधपूर डेपोमधून श्रीगंगानगरला पेट्रोल आणि डिझेलचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा होता. या शहरापासून जयपूर ४७० किलोमीटर तर जोधपूर पाचशे किलोमीटर अंतरावर आहे. यामुळे वाहतुकीचा खर्च देखील मोठ्या प्रमाणावर वाढतो परिणामी येथील पेट्रोल-डिझेलचे दर चढेच राहतात.

यामुळे भाववाढ

  • आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या किमती
  • केंद्राचा सीमाशुल्कात कपातीस नकार
  • राज्य सरकारकडून लावण्यात येणारा व्हॅट
  • अनेक ठिकाणी इंधन वाहतुकीचा खर्च अधिक

नवव्या दिवशीही दरवाढ 
मुंबई - पेट्रोल-डिझेलच्या दरात होणारी वाढ सलग नवव्या दिवशीही कायम होती. राज्यातील बहुतांश शहरात पेट्रोल दर शंभरीच्या उंबरठ्यावर आले आहे. राज्यात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे अनुक्रमे २५ पैसे आणि २६ पैसे वाढ झाली. परिणामी बुधवारी (ता. १७) मुंबईत पेट्रोल ९६ रुपये, तर डिझेल ८६.९८ रुपयांवर पोहोचले. परभणीत पेट्रोलचे दर सर्वाधिक ९८.२५ रुपये होते.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ, केंद्र सरकारचे अधिभार, राज्य सरकारकडून लावला जाणारा व्हॅट आणि वाहतूक खर्चामुळे राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. इंधनदरवाढीचा परिणाम सर्वसामान्यांसह वाहतूकदारांवरही होताना दिसत आहे. इंधन दरवाढीपूर्वी कंपन्यांसोबत निश्‍चित केलेल्या करारामुळे त्यात बदल करू शकत नसल्याने वाहतूकदारांचे प्रचंड नुकसान होत असल्याचे मालवाहतूकदार संघटनांकडून सांगण्यात आले. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com