

Huge Explosives Seized In Rajasthan Ahead Of Republic Day
Esakal
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील थांवला इथं पोलिसांनी एका फार्म हाऊसमधून जवळपास १० हजार किलो अवैध स्फोटकं जप्त केली आहेत. य़ा प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून आरोपीचं नाव सुलेमान खान असं आहे. पोलिसांनी सांगितलं की, सुलेमान विरोधात याआधीही स्फोटक साहित्याबाबत तीन गुन्हे दाखल आहेत. सध्या त्याला अटक केली असून अधिक तपास करण्यात येत आहे.